Monday, July 13, 2026
Homeगडचिरोलीचिचडोह बॅरेजचे ३८ दरवाजे होणार बंद; उपनद्या व नाल्यांमध्ये पाणीसाठ्यात होणार वाढ.....

चिचडोह बॅरेजचे ३८ दरवाजे होणार बंद; उपनद्या व नाल्यांमध्ये पाणीसाठ्यात होणार वाढ.. – गडचिरोली-चंद्रपुर जिल्ह्याच्या नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यातील वैनगंगा नदीवर चामोर्शी तालुक्यामधील चिचडोह बॅरेजचे दरवाजे बंद करून पाणीसाठा करण्याचे नियोजन जलसंपदा विभागाद्वारे करण्यात आले आहे.त्याकरीता येत्या,शनिवार २५ ऑक्टोंबर २०२५ पासून सर्व दरवाजे द्वारसंचलन कार्यक्रमानुसार(प्रथम नदी काठावरिल व क्रमाने नदीच्या मध्यभागातील द्वारे)क्रमा-क्रमाने बंद करण्यात येणार आहेत.त्यामुळे नदी पात्रात उर्ध्व बाजुस व नदीत आलेल्या उपनद्या व नाल्यांमध्ये पाणीसाठा निर्माण होणार आहे आणि नदीतील पाण्याची पातळी वाढणार आहे.
वैनगंगा नदीवर चामोर्शी तालुका मुख्यालयापासून उत्तरेस ५ किलोमिटर अंतरावर चिचडोह धरणचे बांधकाम जून २०१८ मध्ये पूर्ण झालेले आहे.सदर धरण मार्कंडा देवस्थानापासून वैनगंगा नदीचे वरचे बाजुस ४ किलोमिटर अंतरावर आहे.धरणाची एकूण लांबी ६९१ मीटर असून १५ मीटर लांबीचे व ९ मीटर उंचीचे ३८ लोखंडी उभे उचल दरवाजे बसविण्यात आलेले आहेत.धरणात आज,गुरुवार २३ ऑक्टोंबर रोजी पाणी पातळी १७५.३० मी.आहे.
वाढलेल्या पाणीसाठ्यामुळे जिवित व वित्त हानी होवू नये म्हणून सर्व लगतचे गावांना/ ग्रामपंचायतींनी आपले गावकऱ्‍यांना,याबाबत दवंडीद्वारे सुचीत करण्याचे व नदीकाठावरिल शेतांमध्ये कामे करतांना सतर्क राहण्याचे,मासेमारी करणारे व पशुपालक यांनी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातून नदी ओलांडू नये,रेती घाटातून रेती काढणारे आणि नदीपात्रात इतर काम करणाऱ्या लोकांनी खबरदारी घेण्याचे तसेच नदी काठावर जाणे टाळण्याच्या सुचना जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आल्या आहेत.
  • या गावांना धोका👇
गडचिरोली जिल्ह्यातील कुरूळ(चामोर्शी),रामपूर, विसापूर,निमगांव,खोर्दा,हिवरगांव,तळोधी मोकासा, कुनघाडा, नवेगांव (रै.),आमगांव माल,दर्शनी माल, येवली,मार्कंडा,घारगांव,फराडा,डोटकुली,डोंगरगांव (बु.),शिवणी,मुडझा (बु.),पुलखल.तसेच चंद्रपुर जिल्ह्यातील हरांबा,कढोली,उमरी,काजळवाही, डोनाळा माल,डोनाळा चक,वढोली गांडली,वढोली चक,पेडगांव,सोनापूर,सामदा,वाघोली बुटी,व्याहाड (बु.),लोंढोली,उसेगांव,कापसी,उपरी.वाढीव पाणी पातळीमुळे जिवित व वित्त हानी होवू नये म्हणून नदीलगतचे सर्व गावकऱ्यांनी सदर कालावधीत नदीकाठावर जाणे टाळावे,तसेच नदीकाठावरील शेतामध्ये कामे करतांना उचित सतर्कता बाळगावी. मार्कंडा देवस्थान येथील यात्रेकरी, नदीवर आंघोळ करणारे,मासेमारी करणारे, नदीघाटातुन रेती काढणारे,पशुपालक,नदीतून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेवून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन गडचिरोली पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राहूल मोरघडे यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!