Friday, September 4, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यात १५ दिवस जमावबंदी..

गडचिरोली जिल्ह्यात १५ दिवस जमावबंदी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यात अनेक राजकीय पक्ष,संघटना व नागरिकांद्वारे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे, मोर्चे, आंदोलन,सभा,मिरवणूक किंवा इतर सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७(१) व (३) नुसार २३ ऑक्टोंबर २०२५ रोजी मध्यरात्री पासून ६ नोव्हेंबर २०२५ रोजी मध्यरात्रीपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू केला आहे.
या आदेशानुसार शस्त्र,सोटे,तलवारी,भाले,लाठ्या, बंदुका किंवा शरीरावर इजा करण्यासाठी वापरता येतील असे इतर कोणतेही उपकरण व दाहक किंवा स्फोटक पदार्थ बरोबर ठेवण्याबाबत पूर्ण मनाई आहे.सार्वजनिक ठिकाणी व्यक्ती,त्यांच्या प्रतिमा किंवा त्यांच्या दर्शविण्याने समाजात असंतुलन निर्माण करणारे प्रदर्शन,अशोभनीय घोषणाबाजीस मनाई  आहे.
जमावबंदीच्या अटींमध्ये सार्वजनिक रस्त्यावर किंवा सार्वजनिक चावडीवर पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींचा जमाव,मिरवणूका,मोर्चे किंवा कोणताही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करायचा असल्यास उपविभागीय दंडाधिकारी,कार्यकारी दंडाधिकारी किंवा संबंधित पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी आवश्यक राहील.नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मोहफुलाची दारू नाही; तर पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहफुलांचा अवैध मद्यनिर्मितीसाठी होणारा वापर रोखून त्यापासून पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करण्याची सक्षम मूल्यसाखळी जिल्ह्यात उभारावी.महिला बचत गटांना...

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!