- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-भरधाव वेगात असलेल्या ट्रक चालकाचे अचानकपणे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने टाइल्स भरलेला ट्रक पलटी होऊन एकजण जागीच ठार झाला, तर एकाचा रुग्णालयात उपचार सुरू असतांनाच मृत्यू झाल्याची घटना काल गुरुवारी सकाळच्या सुमारास सडक अर्जुनी तालुक्यातील बाम्हणी-खडकी गावाजवळील राजू ढाब्याजवळ घडली.दोघांच्या मृत्यूसह ट्रकखाली दाबून चार जण जखमी झाले.३२ वर्षीय रोहितसिंह ठाकूर रा.कटनी, मध्यप्रदेश असे मृत ट्रक चालकाचे नाव आहे,तर २४ वर्षीय संजय सिंग ठाकूर असे उपचारादरम्यान मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. मोरेश्वर कोरेटी वय २४ वर्षे कुरखेडा,दिनू सेन वय २३ वर्षे रा.कटनी, मध्यप्रदेश,महेंद्र भुरा तटी वय २१ वर्षे, गणेशसिंह जवाहरसिंह ठाकूर वय २४ वर्षे अशी जखमींचा नावे असून स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने ट्रकखालील दबलेल्यांना काढून सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जखमींमध्ये महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील व्यक्तींचा समावेश आहे.जखमी झालेल्या व्यक्तींवर उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे.
एमएच ३५ सीएम ३७७५ क्रमांकाचा ट्रक काल गुरुवारी सकाळच्या सुमारास टाइल्स भरून रायपूर येथून नागपूरकडे जात होता.जात असतांनाच रायपूर-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५३ वरील सडक अर्जुनी तालुक्यातील बाम्हणी-खडकी गावाजवळील राजू ढाब्याजवळ ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी झाला.पलटी होताच ट्रक चालक केबिनमध्येच दबल्या गेला.यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती गावकऱ्यांना होताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमींना तात्काळ उपचारार्थ सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यातील गंभीर जखमीचा उपचार सुरू असतांनाच मृत्यू झाला.उर्वरित चार जणांवर उपचार आहे.
- Advertisement -

