Thursday, September 3, 2026
Homeगडचिरोलीदावा न केलेल्या बँकेतील रक्कम मिळविण्याची सुवर्णसंधी.. - राज्यात ५ हजार ८६६...

दावा न केलेल्या बँकेतील रक्कम मिळविण्याची सुवर्णसंधी.. – राज्यात ५ हजार ८६६ कोटी रुपये बँकेत पडून; बँकेत संपर्क साधण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार १० वर्षांपासून निष्क्रिय असलेल्या बँक खात्यांतील ठेवी “ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधी” या निधीकडे हस्तांतरित केल्या जातात.मात्र, अशा ठेवीदारांना आपली रक्कम परत मिळविण्याचा संपूर्ण अधिकार आहे.यासाठी संबंधितांनी आपल्या बँकेत आवश्यक कागदपत्रांसह संपर्क साधावा,असे आवाहन अग्रणी जिल्हा प्रबंधक प्रशांत धोंगळे यांनी केले आहे.
  • राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्थिती👇
देशभरातील विविध बँकांमध्ये एकूण १.३५ लाख कोटी रुपये इतक्या रकमेच्या ठेवी “DEAF” निधीत आहेत.त्यापैकी महाराष्ट्र राज्यातील ठेवी ५,८६६ कोटी रुपये असून,त्यात वैयक्तिक खाती ४,६१२ कोटी रुपये, संस्थात्मक ठेवी १,०८२ कोटी रुपये आणि सरकारी योजनांतील ठेवी १७२ कोटी रुपये आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्याचा आकडा👇
गडचिरोली जिल्ह्यातील विविध बँकांमध्ये एकूण ४० हजार ४९१ खाती निष्क्रिय असून,त्यातील एकूण रक्कम ७ कोटी ७० लाख २९ हजार ७७० रुपये  इतकी आहे.यात २७९ शासकीय खात्यात ९३.५० लाख तर १२ हजार १५६ संस्थात्मक खात्यात ३.२२ कोटी रुपये आणि २८ हजार ०५६ वैयक्तिक/रिटेल खात्यात ३.५५ कोटी रुपये रक्कम शिल्लक आहे
  • ठेवी परत मिळविण्याची प्रक्रिया👇
ठेवीदारांनी आपल्या संबंधित बँक शाखेत संपर्क साधून खालील प्रक्रिया पूर्ण करावी:
१.अद्ययावत के-वायसी (KYC)कागदपत्रे(ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा इ.)सादर करणे.
२.संबंधित खात्याचा क्रमांक व माहिती द्यावी.
३.एक पत्री दावा अर्ज भरून स्वाक्षरी करावी.
या प्रक्रियेनंतर बँकेमार्फत ठेवीदारांना त्यांच्या मूळ खात्यात रक्कम परत मिळणार आहे.
ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता मोहिमेअंतर्गत १३ ऑक्टोंबर ते १७ ऑक्टोंबर २०२५ या कालावधीत गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालय तसेच सर्व बँक शाखांमध्ये जनजागृती शिबिरे,कॅम्प आणि ग्राहक भेटी आयोजित करण्यात येत आहेत.तसेच २७ ते ३१ ऑक्टोंबर २०२५ या कालावधीत दिवाळीनंतर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बँकांमार्फत विशेष स्टॉल उभारले जाणार आहेत.
“गडचिरोली जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या जनजागृती मोहिमेचा लाभ घ्यावा आणि आपल्या निष्क्रिय खात्यातील रक्कम परत मिळवावी.ही सर्वांसाठी सुवर्णसंधी असून,बँका व जिल्हा प्रशासन नागरिकांना पूर्ण सहकार्य करेल,” असे आवाहन प्रशांत धोंगळे,अग्रणी जिल्हा प्रबंधक बँक ऑफ इंडिया,गडचिरोली यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!