Wednesday, September 9, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तविद्यार्थ्यांनो अभ्यासाला लागा; दहावी-बारावी बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर..

विद्यार्थ्यांनो अभ्यासाला लागा; दहावी-बारावी बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-दहावी आणि बारावीतील विद्यार्थ्यांच्या मनावरील अभ्यासाचे ताण कमी व्हावे, याचबरोबर विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे योग्य नियोजन करता यावे,या उद्देशाने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावी बोर्डाच्या फेब्रु-मार्च २०२६ मधील परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत.मंडळाने यंदाच्या परीक्षा दोन आठवडे आधी घेण्याचा निर्णय घेतला आहे.यानुसार, राज्यभरातील पुणे,नागपूर,छत्रपती संभाजीनगर,मुंबई, कोल्हापूर,अमरावती,नाशिक,लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत या परीक्षा आयोजित केल्या जाणार आहेत.त्यानुसार बारावी बोर्डाची लेखी परीक्षा मंगळवार,१० फेब्रुवारी २०२६ ते बुधवार,१८ मार्च २०२६ या कालावधीत संपन्न होईल.यामध्ये माहिती तंत्रज्ञान आणि सामान्यज्ञान विषयांच्या ऑनलाईन परीक्षांचा समावेश असेल.तर दहावी बोर्डाची लेखी परीक्षा शुक्रवार,२० फेब्रुवारी २०२६ ते बुधवार,१८ मार्च २०२६ या दरम्यान घेण्यात येणार आहेत.लेखी परीक्षांच्या आधी,बारावीच्या प्रात्यक्षिक,तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २३ जानेवारी २०२६ ते ९ फेब्रुवारी २०२६ या दरम्यान होतील.तर, दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा २ फेब्रुवारी २०२६ ते १८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात येतील.शिक्षण मंडळाचे सहसचिव प्रमोद गोफणे यांच्या सहीने हे वेळापत्रक जारी करण्यात आले असून,या परीक्षांचे विषयनिहाय सविस्तर अंतिम वेळापत्रक लवकरच मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पावसाची विश्रांती; पाण्याचे योग्य नियोजन करण्यासह तण,खत तसेच कीड-रोग व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे- कृषी विभाग

उद्रेक न्युज वृत्त :-राज्याच्या विविध भागात ऑगस्ट व सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे.अशा परिस्थितीत धान पिकावर पाण्याचा ताण येऊ नये...

आज डोंगरगाव-हलबी येथे एकल महिला मेळावा संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आज,बुधवार ९ सप्टेंबर रोजी देसाईगंज तालुक्याच्या गट ग्रामपंचायत डोंगरगाव-हलबी येथे परिसरातील चिखली रिट व अरततोंडी येथील...

देसाईगंज पोलिसांची मोठी कामगिरी; हरविलेले २५ मोबाईल मूळ मालकांना परत..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-एकदा कां मोबाईल हरवला, तर तो परत मिळण्याची शाश्वती कमीच असते.मात्र, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद देत देसाईगंज...

गणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी; राज्यभर २० हजार मोफत आरोग्य तपासणी शिबिरे.. – सर्व ३६ जिल्ह्यांत उपक्रमाची व्याप्ती..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-श्रीगणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने राज्यभर सुमारे २० हजार मोफत आरोग्य तपासणी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!