Thursday, September 3, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआज सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या.

आज सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज, मंगळवार ७ ऑक्टोंबर रोजी सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात शेखर सिंह-सध्याचे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त,यांची नाशिकच्या कुंभमेळा आयुक्त पदी बदली करण्यात आली आहे.जलज शर्मा-नाशिकच्या जिल्हाधिकारी पदावरून,नियुक्ती नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त म्हणून करण्यात आली आहे.मनोज जिंदल-महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक,यांची नियुक्ती रत्नागिरी जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे.देवेंद्र सिंह-रत्नागिरीचे जिल्हाधिकारी,यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव,मुंबई येथे करण्यात आली आहे.संजय कोलटे-पूर्वी शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक,मुंबई यांची बदली साखर आयुक्त,पुणे येथे करण्यात आली आहे.आयुष प्रसाद- जळगावचे जिल्हाधिकारी,यांची नियुक्ती नाशिक जिल्हाधिकारी पदी करण्यात आली आहे.रोहन घुघे- ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती जळगाव जिल्हाधिकारी पदी  करण्यात आली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज पहाटे गडचिरोली जिल्ह्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची...

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!