Tuesday, September 1, 2026
Homeगडचिरोलीतेलघाणी व गोदाम बांधकाम करायचेय तर करा अर्ज..

तेलघाणी व गोदाम बांधकाम करायचेय तर करा अर्ज..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यासाठी तेलबियांच्या काढणी पश्चात मूल्य साखळी सहाय्याकरिता लक्षांक प्राप्त झाला आहे.इच्छुक शेतकरी उत्पादक कंपन्यांनी या घटकांचा लाभ घेण्यासाठी त्वरित अर्ज सादर करावेत,असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी केले आहे.
या अभियानांतर्गत दोन प्रमुख बाबींसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत:
१.कापणी पश्चात मूल्य साखळी सहाय्य-तेलबिया (तेलघाणी)तेलबियांचे संकलन,तेल निष्कर्षण आणि पुनर्प्राप्तीमध्ये कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी कापणी पश्चात पायाभूत सुविधा उभारण्यासाठी सरकारकडून विविध घटकांना सहाय्य दिले जाईल.
लक्षांक: जिल्ह्यासाठी १(एक) तेलघाणी युनिटचा लक्षांक आहे.
क्षमता: १० टन क्षमतेपर्यंत असलेल्या तेल निष्कर्षण युनिटसाठी अर्ज करता येईल.
अनुदान: या घटकासाठी प्रकल्प खर्चाच्या ३३ टक्के किंवा कमाल ९.९० लाख रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल,तेवढे सहाय्य अनुज्ञेय राहील.यात जमीन आणि इमारतीसाठी सहाय्य दिले जाणार नाही,तसेच हे खर्च प्रकल्प खर्चात समाविष्ट केले जाणार नाहीत.
२.गोदाम बांधकाम(२५० मेट्रिक टन क्षमता)
तेलबिया साठवणुकीसाठी २५० मेट्रिक टन क्षमतेच्या गोदाम बांधकामासाठी अनुदान उपलब्ध आहे.
लक्षांक: जिल्ह्यासाठी १ (एक) गोदाम बांधकामाचा लक्षांक प्राप्त झाला आहे.
अनुदान: प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के किंवा कमाल १२.५० रुपये लाख, यापैकी जी रक्कम कमी असेल, तेवढे अनुदान अनुज्ञेय राहील.
पात्रता: विस्तृत अंदाजपत्रक बांधकाम विभागाने मंजूर केल्यानंतर तसेच गोदाम बांधकामासाठी कर्ज मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित अर्जदार कंपनी लाभास पात्र राहील.
प्रक्रिया: अर्जदाराने अर्ज सादर केल्यानंतर,जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी पूर्वसंमती देतील आणि त्यानंतर लाभार्थ्यास बांधकाम सुरु करण्याबाबत कार्यारंभ आदेश देण्यात येईल.
अर्ज प्रक्रिया आणि संपर्क
इच्छुक शेतकरी उत्पादक कंपन्यांनी या बाबींसाठी आपले अर्ज संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात सादर करावेत.या योजनेत प्रथम अर्ज, प्रथम प्राधान्य तत्त्व लागू असेल.
निवडलेल्या प्रकल्पांना राज्य कृती आराखड्यांमार्फत आर्थिक सहाय्य दिले जाईल.अधिक माहितीसाठी कृषी विभागाच्या कार्यालयात संपर्क साधावा.
या योजनेचा लाभ घेऊन जिल्ह्याच्या कृषी आणि तेलबिया उद्योगाला बळकटी देण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांनी पुढे यावे,असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

सलग २४ तास हस्तलेखनाचा अनोखा राष्ट्रीय विक्रम.. चंद्रपूरच्या वैष्णवी मांडवकरची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-चंद्रपूरची गुणी कन्या वैष्णवी विश्र्वंभर मांडवकर हिने सलग २४ तास अखंड हस्तलेखन (Handwriting)करून 'सांगितिक वारसा आणि कौटुंबिक प्रवास' हे ८३ पानांचे...

खत उत्पादक कंपनी अथवा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना गरज नसलेल्या निविष्ठांची खरेदी करण्याची सक्ती करू नये- कृषी विभाग -सक्ती अथवा जादा दराने विक्रीबाबत तक्रार नोंदविण्याचे...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर रास्त दरात आणि पुरेशा प्रमाणात खते व निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाकडून नियमित नियंत्रण व तपासणी करण्यात...

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!