Thursday, September 3, 2026
Homeगोंदियागाढ झोपेत असलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला; अंथरूणासह नेले फरफटत..!

गाढ झोपेत असलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला; अंथरूणासह नेले फरफटत..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-नुकतेच तीन दिवसांपूर्वी म्हणजेच गुरुवार २५ सप्टेंबर रोजी गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील वनपरिक्षेत्र कार्यालय गोठणगाव नजीकच्या संजयनगर(बंगाली कॅम्प)येथील पाच वर्षीय चिमुकला अंगणात लघुशंकेला उठलेला असतांना दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला चढवून ठार केल्याची घटना ताजी असतांनाच परत वाघाच्या हल्ल्यात एका महिलेला प्राण गमवावे लागले आहे.सदरची घटना गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील धमदिटोला येथे उघडकीस आली आहे.प्रभाबाई कोराम वय ५० वर्षे असे वाघाच्या हल्ल्यात मृत पावलेल्या महिलेचे नाव असून त्या काल शनिवारी घराच्या समोरील व्हरांड्यात गाढ झोपेत असतांना वाघाने मध्यरात्री हल्ला चढवला. त्यानंतर वाघाने मृत महिलेला अंथरूणासह काही अंतरापर्यंत फरफटत नेले.मध्यरात्रीची घटना असल्याने कुटुंबियां व्यतिरिक्त इतरांच्या लक्षात आली नाही. मात्र आज,रविवार २८ सप्टेंबरला सकाळच्या सुमारास ग्रामस्थांना माहिती होताच घटनास्थळी धाव घेत वनविभागाप्रती संताप व्यक्त केला.मृत महिलेच्या घरासमोर गावकऱ्यांनी जमाव करत कुटुंबीयांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी व हिंस्त्र प्राण्यांचा तात्काळ बंदोबस्त करून जबाबदार वनपाल व वनमजुरावर कारवाई करावी,अशी मागणी रेटून धरली होती.त्यानुसार वनविभागाच्या वतीने मृतक महिलेच्या कुटुंबीयांना तात्काळ १ लाख रुपयांची मदत करण्यात आली व उर्वरित २४ लाख रुपये आठवडाभरात देऊन नागरिकांचा रोष असलेल्या कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन वनाधिकाऱ्यांनी दिले.वारंवार होणाऱ्या मानव-वन्यजीव संघर्षावर तात्काळ उपाययोजना वनविभागाच्या वतीने करण्यात याव्यात, अशीही मागणी स्थानिक नागरिकांनी करून वनविभागावर संताप व्यक्त केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज पहाटे गडचिरोली जिल्ह्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची...

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!