Monday, August 24, 2026
Homeगडचिरोलीजागतीक महिला दिनानिमित्त मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन- महिलांना नोंदणी करण्याचे क्रीडा विभागाचे आवाहन

जागतीक महिला दिनानिमित्त मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन- महिलांना नोंदणी करण्याचे क्रीडा विभागाचे आवाहन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली : – महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने महिला दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.पुरातन काळापासुनच स्त्रीला अनन्य साधारण महत्व असुन स्त्री ही अनंत काळाची माता आहे असे संबोधीले जाते.या उक्तीस अनुसरुन ८ मार्च हा दिवस जागतीक महिला दिन म्हणुन राज्यात सर्वत्र साजरा केला जातो.सदर महिला दिनाचे औचित्य साधुन शालेय मुली,महाविद्यालयीन युवती व सर्व महिलांध्ये तंदुरुस्ती व आरोग्य या बाबत जागृकता निर्माण करण्याकरीता मुलींना अधिकाअधिक क्रीडा विषयक सोई सुविधा,मोकळे वातावरण,कौशल्याची संधी,मुलींच्या आरोग्य न्युट्रेशन,योग्य सवयी उपलब्ध करुन दिल्यास स्त्रीयांची पर्यायाने कुटुंबाची सुधारणा होऊन सशक्त समाज उभा राहील.

केंद्र शासनाच्या २० फेब्रुवारी २०२३ च्या मार्गदर्शक सुचनेनुसार ८ मार्च या दिवसाचे औचित्य साधून जिल्हास्तरावर शालेय व महाविद्यालयीन युवती व महिला करीता १० मार्च ते २५ मार्च २०२३ 

या कालावधीत १०० व २०० मीटर धावणे,कबड्डी, खो-खो,व्हॉलीबॉल,बॅडमिंटन,बॉक्सिंग,टेबल-टेनिस, सुर्यनमस्कार,स्वसंरक्षण दावपेच इत्यादी मनोरंजनात्मक खेळाचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाद्वारे आयोजीत करण्यात येणार आहे.याकरीता शालेय व  महाविद्यालयीन युवती व महिला यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे तसेच सहभागी होणाऱ्या संघांनी, युवक,युवतींनी, महिलांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे सकाळी १० वाजेपर्यंत आपला  सहभागाबाबतची नोंद निश्चित करुन घेण्यात यावी.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत ८ मार्च रोजी दुपारी ४ वाजता महिला दिना निमीत्य जिल्हा क्रीडा संकुल,क्रीडा व सांस्कृतीक भवन,कॉम्पलेक्स गडचिरोली येथे साजरा करण्यात येणार आहे. याप्रसंगी क्रीडा क्षेत्रात व इतर विविध क्षेत्रात उत्तम कागगिरी केलेल्या महिलांचा सत्कार करण्यात येणार असून याप्रसंगी सांस्कृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांनी,युवक-युवतींनी उपस्थित राहावे; असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गडचिरोली प्रशांत दोंदल यांनी केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अंगावर भिंत कोसळून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातून आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खामखुरा गावात घरासमोरील अंगणात...

माता व बालक मृत्यू प्रकरणी चौकशी समिती गठीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी येथील प्रसूती प्रकरणात माता व बालकाच्या मृत्यूची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक स्तरावर चौकशी समिती गठीत करण्यात...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना.. – विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर बनावे- प्रा.डॉ.निलेश हलामी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाॅ.श्रीराम गहाणे यांच्या मार्गदर्शनात शैक्षणिक सत्र २०२६-२७ करिता वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना...

धावत्या बसमधून खाली कोसळताच दुसऱ्या बसने चिरडले; तरुणीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-पुण्यातील सिंहगड मार्गावरील माणिकबाग परिसरात आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. खानापूर-स्वारगेट मार्गावरील धावत्या पुणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!