Wednesday, September 9, 2026
Homeगडचिरोलीयुवकांसाठी रोजगार व कौशल्य विकासाची मोठी संधी..

युवकांसाठी रोजगार व कौशल्य विकासाची मोठी संधी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी,संचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय आणि महिंद्रा अँण्ड महिंद्रा यांच्यातील त्रिपक्षीय सामंजस्य कराराअंतर्गत क्रांतिवीर बाबुराव शेडमाके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी),गडचिरोली,येथे ३९० तासांचा “ट्रॅक्टर सर्विस मेकॅनिक” अभ्यासक्रम पथदर्शी प्रकल्प म्हणून राबविला जाणार आहे.जिल्ह्यातील युवकांसाठी ही रोजगार व कौशल्य विकासाची एक मोठी संधी असून जिल्ह्यातील युवकांनी या प्रशिक्षणासाठी मोठ्या संख्येने नोंदणी करून आपल्या करिअरला नवी दिशा देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
 
प्रशिक्षणासाठी पात्रता👇
प्रशिक्षणासाठी उमेदवारांचा वयोगट १८ ते २८ वर्षांदरम्यान असावा.शैक्षणिक पात्रता किमान १० वी उत्तीर्ण,१२ वी उत्तीर्ण किंवा आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांनाही संधी उपलब्ध आहे.उमेदवाराचे वजन ४५ किलोपेक्षा जास्त असणे आवश्यक असून,गंभीर आजार नसावा.तसेच प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तात्काळ काम करण्यास तयार असणे अपेक्षित आहे.
युवकांना रोजगार संधी👇
 
हा प्रकल्प ग्रामीण युवकांना रोजगार देणारा ठरणार असून,प्रशिक्षणानंतर महिंद्रा अँण्ड महिंद्रा व अन्य औद्योगिक क्षेत्रात रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.इच्छुक उमेदवारांसाठी निवासाची सुविधाही करण्यात आली आहे.
संपर्क👇
अधिक माहितीसाठी शासकीय आयटीआय येथील निदेशक श्रीधर बावनकर,(मो.७०५७०७०७८७)व  जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या प्रियंका इडपात्रे,(मो. ७८४३०४८२४९)यांच्याशी संपर्क साधावा,असे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुरेश चौधरी यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पावसाची विश्रांती; पाण्याचे योग्य नियोजन करण्यासह तण,खत तसेच कीड-रोग व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे- कृषी विभाग

उद्रेक न्युज वृत्त :-राज्याच्या विविध भागात ऑगस्ट व सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे.अशा परिस्थितीत धान पिकावर पाण्याचा ताण येऊ नये...

आज डोंगरगाव-हलबी येथे एकल महिला मेळावा संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आज,बुधवार ९ सप्टेंबर रोजी देसाईगंज तालुक्याच्या गट ग्रामपंचायत डोंगरगाव-हलबी येथे परिसरातील चिखली रिट व अरततोंडी येथील...

देसाईगंज पोलिसांची मोठी कामगिरी; हरविलेले २५ मोबाईल मूळ मालकांना परत..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-एकदा कां मोबाईल हरवला, तर तो परत मिळण्याची शाश्वती कमीच असते.मात्र, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद देत देसाईगंज...

गणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी; राज्यभर २० हजार मोफत आरोग्य तपासणी शिबिरे.. – सर्व ३६ जिल्ह्यांत उपक्रमाची व्याप्ती..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-श्रीगणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने राज्यभर सुमारे २० हजार मोफत आरोग्य तपासणी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!