Sunday, April 19, 2026
Homeगडचिरोलीयेत्या बुधवारी "बच्चू कडू" आरमोरी शहर व देसाईगंजच्या कुरुड गावात.. -शेतकरी,दिव्यांग बांधव...

येत्या बुधवारी “बच्चू कडू” आरमोरी शहर व देसाईगंजच्या कुरुड गावात.. -शेतकरी,दिव्यांग बांधव तथा नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राज्यातील शेतकरी,शेतमजूर,दिव्यांग बांधव,निराधार व गोर गरिबांच्या हक्कासाठी शासनाला धारेवर धरणारे प्रहार जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री “बच्चू कडू” हे येत्या,बुधवार २४ सप्टेंबर २०२५ रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून ते त्याच दिवशी आरमोरी शहर व देसाईगंज तालुक्याच्या कुरुड गावात राज्यव्यापी हक्क यात्रेच्या निमित्ताने सभा घेणार आहेत.सभेत शेतकरी, निराधार,दिव्यांग,विधवा,शेतमजूर यांना मार्गदर्शन व दिव्यांग बांधवांचे हक्क आणि त्यांचे अधिकार यावर मार्गदर्शनपर भाषण करणार आहेत.
सध्याच्या घडीला बच्चू कडू यांच्या नेतृत्वात राज्यव्यापी हक्क यात्रा सुरू आहे.या अनुषंगाने येत्या बुधवारी दुपारी २ वाजता आरमोरी शहराच्या बर्डी टी पाईन्ट जवळील साई दामोदर मंगल कार्यालयात जाहीर हक्क सभा आयोजित करण्यात आली आहे.तर त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजे देसाईगंज तालुक्याच्या कुरुड गावातील झुरे मोहल्ल्याच्या मारोती मंदिर देवस्थान या ठिकाणी हक्क सभेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मालास हमीभाव,शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करावा, जनसुरक्षा विधेयक रद्द करण्यात यावा,शेतकऱ्यांची सुपीक जमीन मोठ्या उद्योगांना देण्यात देवू नये, शेतकऱ्यांना २४ तास मोफत वीज पुरवठा करण्यात यावा व इतर हक्क संदर्भात सभा होणार असल्याने परिसरातील शेतकरी, शेतमजूर,दिव्यांग बांधव,निराधार, मेंढपाळ,मच्छिमार व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन गडचिरोली जिल्हा प्रहार संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची; सर्व शैक्षणिक संस्था सकाळच्या सत्रात सुरू ठेवण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अश्यातच चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाची...

चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच उडाला भडका; पतीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-स्वयंपाकघरातील गॅस लिकेज असल्याने चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच आगीचा अचानकपणे भडका उडाला आणि काही क्षणातच सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला.दरम्यान,संपूर्ण घरात...

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!