Sunday, August 2, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तओबीसी आरक्षण धोक्यात आल्याची चिंता; आणखी एकाने संपवली जीवनयात्रा..!

ओबीसी आरक्षण धोक्यात आल्याची चिंता; आणखी एकाने संपवली जीवनयात्रा..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त:-नुकतेच तीन दिवसांपूर्वी म्हणजेच ११ सप्टेंबर रोजी लातूर जिल्ह्याच्या रेणापूर तालुक्यातील वांगदरी गावातील ३५ वर्षीय तरुण भरत कराड यांनी ओबीसी आरक्षण धोक्यात आल्याच्या कारणावरून मांजरा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केल्याचे प्रकरण ताजे असतांनाच आता आणखी एकाने ओबीसी आरक्षण धोक्यात आल्याची चिंता व आपल्या दोन मुलींचे पुढे काय होणार? या विवंचनेतून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. सदरची घटना बीड जिल्ह्याच्या नाथापूर गावात काल शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.गोरख नारायण देवडकर वय ५० वर्षे असे आत्महत्या केलेल्या पित्याचे नाव असून गोरख देवडकर यांना पाच मुली आहेत.तीन मुलींचे लग्न झाले,त्यापैकी दोन मुली पोलीस भरतीची तयारी करत आहेत.मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळाल्यामुळे ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांमध्ये मोठी स्पर्धा वाढून आपल्या मुलींना नोकरी मिळेल कशी?असा प्रश्न त्यांच्या मनात घर करून सोडत होता.त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी मुलींसोबत संवाद साधून खंत व्यक्त केली होती आणि त्याच रात्री जीवनयात्रा संपवील्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. ओबीसी आरक्षण धोक्यात आल्याच्या कारणावरून राज्यातील ही दुसरी घटना असल्याने आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण आणखी चिघळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चिमुकलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या करणाऱ्या नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात चीमुकल्यांवर अत्याचार होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो (एनसीआरबी)च्या अहवालानुसार,महाराष्ट्र राज्यात बालकांवरील अत्याचारांचे प्रमाण...

तीन चिमुकल्यांचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू; आज दुपारच्या घटनेने हळहळ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील मौजा-खेडेगाव येथे आज,शनिवार १ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे १२.३० वाजताच्या सुमारास सती नदीत आंघोळीसाठी गेलेल्या चार अल्पवयीन मुलांपैकी...

अखेर पुरात वाहून गेलेल्या ‘त्या’ इसमाचा सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील मांदेड येथे अतिवृष्टीमुळे दुथडी भरून वाहणाऱ्या नाल्यात पडून एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात असतांनाच अखेर...

युरोप आणि चीन दौऱ्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदेशातील शेतीचा अभ्यास करण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे आयोजित करण्यात येतात.सन २०२६-२७ साठी राज्य पुरस्कृत या योजनेत युरोप, चीन या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!