- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडून मागील महिन्याच्या २० ऑगस्ट रोजी राज्यातील पोलिस शिपाई आणि कारागृह शिपाई भरती बाबत शासन निर्णय जारी करण्यात आला होता.त्यानुसार पोलिस शिपाई-१२ हजार ३९९ पदे,पोलिस शिपाई चालक-२३४ पदे,बॅण्डस्मन-२५ पदे,सशस्त्र पोलिस शिपाई-२ हजार ३९३ पदे आणि कारागृह शिपाई-५८० पदे,असे एकूण १५ हजार ६३१ पदांच्या भरतीला शासनाच्या वतीने हिरवा कंदील देण्यात आला आहे.राज्यातील पोलिस शिपाई आणि कारागृह शिपाई १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२५ दरम्यान रिक्त झालेली पदे शंभर टक्के भरण्याचा निर्णय शासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. पोलिस भरती प्रकियेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरीता ४५० रुपये तर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३५० रुपये इतके परीक्षा शुल्क आकारले जाणार आहे.अश्यात आता परत पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे.पोलीस भरतीमध्ये सन २०२२ ते २०२५ या चार वर्षात वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना आणखी एक वेळची संधी देण्यात येत आहे.विशेष म्हणजे,या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे आणि भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.याबाबतचा शासन निर्णय तीन दिवसांपूर्वी बुधवारी १० सप्टेंबरला गृह विभागाकडून जारी करण्यात आला आहे.त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या आणि वय झालेल्यांना तरुणांनाही संधी मिळणार आहे.
- Advertisement -

