Wednesday, June 24, 2026
Homeकुरखेडातीन वर्षे लोटूनही रोजगार हमी योजनेतून रोजगार मिळेना...!- कुरखेडा तालुक्यातील भगवानपूर ग्रामपंचायतीतील...

तीन वर्षे लोटूनही रोजगार हमी योजनेतून रोजगार मिळेना…!- कुरखेडा तालुक्यातील भगवानपूर ग्रामपंचायतीतील प्रकार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

कुरखेडा :- तालुक्यातील भगवानपूर ग्रामपंचायतीला स्वतंत्र ग्रामपंचयतीचा दर्जा मिळून तीन वर्षे लोटून गेलीत.मात्र रोजगार हमी योजनेची ऑनलाईन लॉगिन जुन्याच ग्रामपंचायतीकडे असल्याने गावातील भगवानपूर व वाढोना येथील मजुर वर्ग रोजगार हमी योजनेच्या कामापासून कोसोदुर वंचित असल्याचे दिसून येत आहे.

पूर्वी सावलखेडा ग्रामपंचायतीमध्ये भगवानपूर व वाढोना अशी तिन्ही गावे मिळून गट ग्रामपंचायत होती.मात्र भगवानपूर व वाढोना गावातील पाहिजे त्या प्रमाणात विकास होत नसल्याने नागरिकांनी दोन गावांसाठी भगवानपूर व वाढोना गावाला सावलखेडा ग्रामपंचायतीमधून वगळून भगवानपूर गावाला स्वतंत्र गट ग्रामपंचायतीचा दर्जा देण्यासाठी शासन स्तरावर मागणी केली होती.त्यानुसार तालुक्यातील सावलखेडा गट ग्रामपंचायतीचे विभाजन करून भगवानपूर गावाला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा देण्यात आला.स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा मिळून तीन वर्षे लोटून गेलीत तरी सुद्धा रोजगाराची हमी असलेल्या रोजगार हमी योजनेची कामे गावातील नागरिकांनी मिळत नसल्याने यांस जबाबदार कोण? असा सवाल दोन्ही गावातील नागरिकांकडून केला जातो आहे.

एकीकडे शासन वर्षाकाठी एका कुटुंबातील सदस्यांना १०० दिवस रोजगार देण्याची हमी देतो तर दुसरीकडे मजुर वर्ग रोजगार हमी योजनेच्या कामापासून कोसोदुर असल्याचे दिसून येत आहे.भगवानपूर ग्रामपंचयतीच्या रोजगार हमी योजनेची ऑनलाईन लॉगिन केव्हा सुरू केली जाणार व गावातील नागरिकांना रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून रोजगार मिळणार की नाही? असा प्रश्न पडला असल्याने गडचिरोली उपजिल्हाधिकारी रोहयो यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसवा; अन्यथा १ जुलैपासून दंडात्मक कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट(HSRP)बसविणे बंधनकारक केले आहे.या कामासाठी शासनाने...

बापरे..! जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यतेचे आदेश.. – चक्क जिल्हाधिकाऱ्यांचे पोलीस अधीक्षकांना कारवाईचे पत्र..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा खनिज प्रतिष्ठान(डीएमएफ) गडचिरोली यांच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यता आदेश तयार करून प्रसारित करण्यात आल्याच्या गंभीर प्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा...

आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सन-१९९७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी तथा राष्ट्रपती पदक सन्मानित 'धडाकेबाज' अधिकारी ५३ वर्षीय विश्वास नांगरे पाटील आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त असणार...

कोंढाळा ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक “एकल महिला दिन” साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):- कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे म्हणजेच एखाद्या महिलेच्या पतीचे निधन झाल्यास एकटेपणाच्या काळात महिलांना सहन करावा लागणारा सामाजिक,आर्थिक व इतर त्रास किती चटके लावणारा असतो;...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!