Wednesday, September 2, 2026
Homeगडचिरोलीनवऱ्याने खून केल्याचा संशय अन् भांडाफोड झाला.. -तब्बल तीन दिवसांनी जंगलात आढळला...

नवऱ्याने खून केल्याचा संशय अन् भांडाफोड झाला.. -तब्बल तीन दिवसांनी जंगलात आढळला होता विवाहित महिलेचा मृतदेह..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या कोरची तालुक्यात तब्बल तीन दिवसांनी जंगलात एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.प्रकरणी दारुड्या नवऱ्यानेच मुलीचा खून केल्याचा संशय सासूने केला होता.सासूच्या तक्रारीवरून कोटगूल पोलिसांनी मृत महिलेच्या पतीस संशियत आरोपी म्हणून गुरुवार ४ सप्टेंबर रोजी अटक केली होती व काल शुक्रवारी संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला.टामीनबाई पुरुषोत्तम कचलाम वय ३४ वर्षे,असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून पुरुषोत्तम गजराज कचलाम वय ३७ वर्षे,रा.सोनपूर, ता.कोरची,जि.गडचिरोली असे आरोपी पतीचे नाव आहे.
पुरुषोत्तम कचलाम यास दारूचे व्यसन जडले होते. दारूच्या नशेत पत्नी टामीनबाई हिच्याशी नेहमी वाद घालून चारित्र्यावर संशय घ्यायचा.पुरुषोत्तमच्या रोजच्या कटकटीपायी पत्नी तसेच नऊ व पाच वर्षांची दोन्ही चिमुकले त्रासले होते.त्यामुळे टामीनबाईने छत्तीसगडच्या मानपूर-मोहला जिल्ह्यातील चौकी गावी तिचे माहेर असल्याने आई चमरीबाई बोगा हिच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार सोमवार १ सप्टेंबर २०२५ रोजी पती पुरुषोत्तम व टामीनबाई दोघेही सोनपूर येथून जंगल मार्गे पायी निघाले होते.जात असतांनाच वाटेत कामेली वनक्षेत्रात दोघांमध्ये वाद झाला.वाद होताच दारूच्या नशेत असलेल्या पुरुषोत्तमने पत्नीच्या छातीवर बसून तिचा गळा दाबला.गळा दाबताच तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला.मृत्यू होताच आरोपी पुरुषोत्तम याने घटनेची कुठेही वाच्यता न करता घरी परतला. अश्यातच तब्बल तीन दिवसांनी जंगल परिसरात मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.त्यानुसार मृतदेहाची ओळख पटताच मृत टामीनबाई हिच्या आईला माहिती देण्यात आली.मृत महिलेची आई चमरीबाई बोगा हिने कोटगूल पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली होती.त्यानुसार पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून मृत महिलेच्या पतीस अटक केली होती.अटक करताच आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली.पोलिसी खाक्या मिळताच पुरुषोत्तमने गुन्हाची कबुली दिली.त्यानुसार आरोपी पुरुषोत्तम कचलाम याचेवर पत्नीच्या हत्ये प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रकरणाचा पुढील तपास कोटगुल पोलीस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार कृष्णा सोळुंके करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!