Monday, September 21, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तनुकसानभरपाईसह धान विक्री करीता ई-पीक पाहणी नोंदणी आवश्यक.. - शेतकरी स्तरावरील व...

नुकसानभरपाईसह धान विक्री करीता ई-पीक पाहणी नोंदणी आवश्यक.. – शेतकरी स्तरावरील व सहाय्यक स्तरावरील ई-पीक पाहणीची अंतिम तारीख जाहीर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-डिजिटल ई-पीक पाहणी ही शेतकऱ्यांच्या भविष्यातील पीक विमा,नुकसानभरपाई, धान विक्री व शासकीय योजनांच्या लाभासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या सातबारा उताऱ्यावर खरीप हंगामातील पिकांची नोंद ई-पीक पाहणी ॲपद्वारे वेळेत पूर्ण करावी,असे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत.खरीप हंगाम २०२५ साठी शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणी १ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२५ या कालावधीत,तर सहाय्यक स्तरावरील ई-पीक पाहणी १५ सप्टेंबर ते २९ ऑक्टोंबर २०२५ या कालावधी पर्यंत करून घेणे आवश्यक आहे.अश्यातच
शेतकऱ्यांनी सहाय्यक कर्मचाऱ्यांवर अवलंबून न राहता शक्य तितकी ई-पीक पाहणी स्वतःच पूर्ण करावी.ई-पीक पाहणीदरम्यान कोणतीही अडचण आल्यास, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी गावनिहाय नेमण्यात आलेले ई-पीक पाहणी सहाय्यक सज्ज असून अश्यांची मदत घ्यावी.त्यातच शेतकऱ्यांच्या उत्पादित धानाला हमीभाव मिळावा.शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून लूट होऊ नये, यासाठी केंद्र शासनाची किमान आधारभूत किंमत योजना कार्यान्वित आहे.योजनेअंतर्गत जिल्हा पणन कार्यालय आणि आदिवासी विकास विभागाच्या उपअभिकर्ता संस्थामार्फत धानाची खरेदी केली जाते. संपूर्ण खरेदी प्रक्रीया ऑनलाईन पोर्टलद्वारे होणार आहे. फक्त नोंदणीकृत शेतकऱ्यांनाच खरेदी केंद्रावर बोलावले बोलावले जाणार आहे.ई-पीक पीक प्रकार,उत्पादन क्षेत्र व खातेदारांची माहिती ही ई-पीक पाहणीवर आधारित आहे.आधार क्रमांक,बँक खाते,तपशिल आदी माहिती ऑनलाईन प्रणालीशी संलग्न केली जाईल.शेतकऱ्यांना किमान आधारभूत दराने थेट बँक खात्यात रक्कम जमा होईल,त्यासाठी ई-पीक पाहणीची नोंद करणे आवश्यक आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्र शासनाच्या वतीने गडचिरोलीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग,सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासन,गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या,मंगळवार २२ सप्टेंबर २०२६ रोजी...

भरधाव ट्रकची कारला मागून जोरदार धडक; दोघांचा करुण अंत,तर पाच जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील कोरधा गावाजवळ एक अत्यंत भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.गावाकडे परत निघालेल्या कुटुंबीयांच्या कारला भरधाव ट्रकने मागून जोरदार...

क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद; बेदम मारहाणीत बापाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-अगदी क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद झाला खरी,पण रागाच्या भरात ३० वर्षीय मुलाने  वडिलांना काठीने बेदम मारहाण केल्याने मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या...

चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात; तीन जणांचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-मुंबईतील कोस्टल मार्गावर आज,रविवार २०  सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाला.मरीन ड्राईव्हकडून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!