Monday, September 21, 2026
Homeगडचिरोलीतरुण-तरुणींसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन..

तरुण-तरुणींसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने गडचिरोलीतील तरुण-तरुणींसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश जिल्ह्यातील तरुणांना विविध कौशल्यांमध्ये सक्षम बनवून त्यांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आहे.या प्रशिक्षणामध्ये तरुणांच्या स्थानिक गरजा लक्षात घेऊन विविध क्षेत्रांमधील कोर्सेसचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये कृषी,बांधकाम,आयटी,पर्यटन व आदरातिथ्य, खाणकाम, वाहन उद्योग,ग्रीन जॉब्स,व्यवस्थापन आणि उद्योजकता, आरोग्य सेवा,वस्त्रोद्योग,मीडिया आणि मनोरंजन,फर्निचर अशा अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांचा समावेश आहे.ज्या शासकीय संस्थांची नोंदणी आधीपासूनच एमएसएसडीएस पोर्टलवर आहे,त्यांना पुन्हा प्रस्ताव सादर करण्याची आवश्यकता नाही. मात्र,ज्या शासकीय संस्थांची नोंदणी नाही,त्यांनी ग्रीनचॅनलद्वारे या पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक आहे.त्याचप्रमाणे,इतर खाजगी आस्थापना, औद्योगिक आस्थापना आणि व्यवसाय प्रशिक्षण संस्थांना हे प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यासाठी स्किल इंडिया पोर्टलवर नोंदणी असणे आणि संबंधित कोर्सेससाठी मान्यता प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.या सर्व इच्छुक संस्थांनी आपले प्रस्ताव ८ सप्टेंबर २०२५ पर्यंत सादर करावेत.या संदर्भात अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,बॅरेक क्र.२,शासकीय संकुल, गडचिरोली येथे संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्र शासनाच्या वतीने गडचिरोलीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग,सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासन,गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या,मंगळवार २२ सप्टेंबर २०२६ रोजी...

भरधाव ट्रकची कारला मागून जोरदार धडक; दोघांचा करुण अंत,तर पाच जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील कोरधा गावाजवळ एक अत्यंत भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.गावाकडे परत निघालेल्या कुटुंबीयांच्या कारला भरधाव ट्रकने मागून जोरदार...

क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद; बेदम मारहाणीत बापाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-अगदी क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद झाला खरी,पण रागाच्या भरात ३० वर्षीय मुलाने  वडिलांना काठीने बेदम मारहाण केल्याने मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या...

चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात; तीन जणांचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-मुंबईतील कोस्टल मार्गावर आज,रविवार २०  सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाला.मरीन ड्राईव्हकडून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!