Thursday, September 10, 2026
Homeगडचिरोलीआठवणीतील 'सोपानदेव' राज्यस्तरीय कविसंमेलन संपन्न.. - डीबीएच्या गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी कवी प्रभाकर दुर्गे...

आठवणीतील ‘सोपानदेव’ राज्यस्तरीय कविसंमेलन संपन्न.. – डीबीएच्या गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी कवी प्रभाकर दुर्गे यांची नियुक्ती..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच रत्नागिरी महाराष्ट्र-भारत साहित्य संस्थेचे नागपूर विभागीय अध्यक्ष तथा गडचिरोली जिल्हाध्यक्ष सोपानदेव म्हशाखेत्री यांचे ७ जुलै २०२५ रोजी देहावसान झाल्याने त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ऑनलाईन सभा आयोजित करुन स्वरचित गितांमधून आदरांजली वाहण्यात आली होती.तथापि स्मृतिशेष म्हशाखेत्री हे गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा येथील भूमी पुत्र असल्याने जिल्हा मुख्यालयी बॅंक ऑफ इंडिया स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था,जिल्हाधिकारी कार्यालय मार्ग,कॉम्प्लेक्स परिसर गडचिरोली येथे नुकतेच डीबीएचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मनोज जाधव रत्नागिरी व संस्थापिका कवियित्री भावना खोब्रागडे चंद्रपूर यांच्या कल्पनेतून “आठवणीतील सोपानदेव राज्यस्तरीय कविसंमेलन” आयोजित करण्यात आले होते.प्रसंगी महामानवांच्या प्रतिमांचे पूजन करून सोपानदेवांच्या प्रतिमेला वंदन करण्यात आले.बुद्धवंदना आणि भारतीय राज्यघटना प्रास्ताविक वाचन झाल्यानंतर सोपानदेव आणि पहलगाम हल्ल्यातील शहिदांना मानवंदना देण्यात आली.अशोक नेते,अनुसूचित जमाती राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी खासदार चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्र यांनी सोपानदेवांशी असलेले नातेसंबंध, सामाजिक बांधिलकी व त्यांच्या अकाली निधनाने झालेली हानी आपल्या ‘मन की बात’ मधून व्यक्त केली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महिला प्रतिनिधींनी सोपानरावांच्या धर्मपत्नी आयु.सरिता म्हशाखेत्री व कन्या आयु. माधुरी अविनाश बारसिंगे यांना साडीचोळींची भेट देऊन दुःखातून सावरण्यासाठी सांत्वन केले.
सोपानदेवांच्या निधनाने रिक्त झालेल्या त्यांच्या पदावर ॲड.डॉ.पी.डी.काटकर (माणिक-पुत्र)यांची डीबीएच्या नागपूर विभागीय अध्यक्ष पदी,तर युवा कवी प्रभाकर दुर्गे यांची गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी व कवयित्री सुमन चव्हाण यांची गडचिरोली जिल्हा सचिव पदावर नियुक्ती करण्यात आल्याने नवागतांचे स्वागत करण्यात आले.
सोपानदेव हे एक अग्रगण्य साहित्यिकच नाही तर प्रख्यात समाजसेवक,धुरंधर राजकारणी,कुशलज्ञ पत्रकार व धम्मप्रचारक अशा विविधांगी भूमिकांनी सुप्रसिद्ध असल्याने या कविसंमेलनात महाराष्ट्राच्या विविध भागातील ३७ नामवंत कवी,आणि अन्य क्षेत्रातील दिग्गज प्रकाश गेडाम,भुसे किसान सभा,आशिष पिपरे युवा कार्यकर्ते गडचिरोली जिल्हा ओबीसी सेल,कविता खोब्रागडे उपाध्यक्षा गडचिरोली जिल्हा-भारतीय बौद्ध महासभा,फुलचंद वाघाडे पत्रकार अशा सर्वच क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती लाभली.उद्घाटक देवनाथ म्हशाखेत्री व नरेश रामटेके यांनी भावविभोर होत स्मृतींना उजाळा दिला.संस्थापिका भावना यांची दोन्ही गिते भावपूर्ण होती.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात मान्यवरांची भाषणे आणि दुसऱ्या सत्रात कविसंमेलन पार पडले.रवि ताकसांडे चंद्रपूर जिल्हा सचिव यांनी मधुर ओघवत्या वाणीत सूत्रसंचालन केले.पहिल्या सत्रात आभार प्रकटन ॲड.डॉ.पी.डी.काटकर यांनी तर दुसऱ्या व अंतिम सत्रात आभाराची गुंफन सुमन चव्हाण यांनी केली.उषा घोडेस्वार,गंगाधर धुवाधपारे,ज्योत्स्ना बन्सोड,प्रभाकर दुर्गे,सुमन चव्हाण,संगीता दुधे,स्वप्निल बांबोळे,नरेश रामटेके,संदीप आंबोरकर,प्रेमीला अलोने,गंगाधर दाभाडे यांनी कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्रयत्न केलेत.दिवंगत ख्यातनाम कवीला काव्यांजली वाहत आदरभाव व्यक्त करण्याचा असा हा पहिलाच कार्यक्रम असल्याने आयोजकांचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धरणात बुडालेल्या तरुण शेतकऱ्याचा सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बैल पोळा सणाच्या एक दिवसापूर्वी धरण परिसरात बैल धुण्यासाठी गेलेला तरुण शेतकरी बुडाल्याची घटना काल,बुधवार ९ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या...

सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन,वारसा हक्क,पदोन्नती व निवासाच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करा- राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांचे आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता राखण्यात सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.त्यामुळे त्यांच्या वेतन,सेवा,आरोग्य, निवास व आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा...

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये उत्तम मूल्यसंस्कार रुजविणे काळाची गरज-शिक्षणमंत्री दादाजी भुसे – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत आज विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी.. – पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच भावी पिढीवर राष्ट्रभक्तीचे आणि उत्तम मूल्यांचे संस्कार रुजवणे गरजेचे आहे.गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही...

अजब लाचेची गजब कहाणी..! दोन्ही हातांच्या दहा बोटांचा इशारा करून मागितली १० हजाराची लाच.. – पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  छत्रपती संभाजीनगर :-राज्याच्या विविध भागात सरळ-सरळ तोंडी बोलणी करून अनेकजण लाच घेतांना व एसीबीच्या जाळ्यात अडकतांना दिसून येतात.पण, नुकतेच छत्रपती संभाजीनगर(पूर्वीचे औरंगाबाद)शहरात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!