- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-राज्यातील विविध बांधकाम विभागातील कंत्राटदारांचे कोट्यवधी रुपयांचे देयके थकीत असल्याने काही दिवसांपूर्वीच राज्यातील कंत्राटदारांनी भिक मांगो आंदोलन केले होते.अश्यातच आता जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षकांना त्यांच्या हक्काचे उपदान,अंश राशीकरण व गट विमा योजना अंतिम परतावा म्हणून घेणे असलेली हक्काची तब्बल १०० कोटी रुपयांची रक्कम शासनाकडे थकली आहे.गेल्या दीड वर्षापासून शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.परंतु,शासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने याविरोधात शिक्षक दिनी येत्या,५ सप्टेंबर २०२५ रोजी नागपूरच्या संविधान चौक,येथे शिक्षक संघटना ‘भीक मांगो आंदोलन’ करणार आहे.सेवानिवृत्त शिक्षकांचे थकीत उपदान व अंश राशीकरण अनुदानाची १०० कोटी रुपयांची रक्कम व्याजासह तात्काळ द्यावी,दरमहा सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांसाठी अंदाजे १ कोटी रुपयांचा निधी अग्रीम स्वरूपात जिल्हा परिषदेला उपलब्ध करावा,गट विमा योजनेची अंतिम थकीत रक्कम वेतनपत्रकाची पडताळणी करून व्याजासह मंजूर करावी इत्यादी शिक्षकांच्या प्रमुख मागण्या असून आंदोलनाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक, शिक्षकेत्तर शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले आहे.तब्बल ४०० हून अधिक सेवानिवृत्त शिक्षकांचे उपदान,अंश राशीकरण व गट विमा योजना याअंतर्गत मिळणारी वारंवार मागण्या करूनही शासन गंभीर नसल्याने सेवानिवृत्त शिक्षक आर्थिक अडचणीत सापडले आहेत.प्रत्येक शिक्षकाची २५ ते ३० लाख रुपयांची रक्कम दीड वर्षापासून अडकून आहे.त्यात दर महिन्याला नव्याने सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांची भर पडत असून,दरमहा तब्बल एक ते सव्वा कोटींची थकबाकी वाढत आहे.
- Advertisement -

