- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील आष्टी वरून रात्रीच्या सुमारास चार तरुण चारचाकी वाहनाने घोट कडे जात असतांनाच घोट-आष्टी मार्गावरील ठाकुरनगरच्या पहाडीजवळ वळण असलेल्या मार्गावर कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने भरधाव वेगात असणारी कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला जाऊन आदळली.यात एका तरुणाचा कारमध्येच मृत्यू झाला,तर तिघे तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना काल मंगळवारच्या मध्यरात्रीच्या सुमारास घडली. अपघातात अमन मुज्जफर शेख वय २४ वर्षे रा.ता.अहेरी( हल्ली मुक्काम-घोट)असे मृतक तरुणाचे नाव आहे.तर निखील नरेश राऊत वय २३ वर्षे,सचिन शेखर अधिकारी वय ३२ वर्षे व अभय शंकर रॉय वय २२ वर्षे तिघेही रा.घोट,ता.चामोर्शी,जि.गडचिरोली अशी जखमींची नावे असून सचिन अधिकारी याचेवर चंद्रपूर येथे उपचार सुरू आहे.तर अभय रॉय व निखील राऊत या दोघांवर गडचिरोली सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेतील चारही तरुण रात्रीच्या सुमारास एमएच ३३ ए ४१४१ या क्रमांकाच्या मारुती सुझुकी कारने आष्टी वरून घोटकडे परत येत होते.अश्यातच भरधाव वेगात असलेली कार वळण मार्गावर अनियंत्रित झाल्याने धाडकन रस्त्याच्या कडेला असलेल्या सागवनच्या झाडाला जाऊन आदळली.धडक इतकी भीषण होती की,अमन कारमध्येच मृत्यू झाला.घटनेची माहिती घोट पोलीस मदत केंद्रास होताच केंद्राचे एपीआय किशोर शिंदे,पीएसआय संजय गोंगले सह पथक घटनास्थळी दाखल होत जखमींना तात्काळ पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.घटनेचा पुढील तपास घोट पोलीस मदत केंद्राचे पीएसआय संजय गोंगले करीत आहेत.
- Advertisement -

