Tuesday, June 23, 2026
Homeगडचिरोली"आम्ही काम केले,खिशातले पैसे कामावर खर्च केले, व्याजाने कर्जाची रक्कम घेतली; पण...

“आम्ही काम केले,खिशातले पैसे कामावर खर्च केले, व्याजाने कर्जाची रक्कम घेतली; पण रक्कम मिळण्याचे नावच घेईना”..! -आता भिकमागल्याशिवाय पर्याय नाही; कंत्राटदार शासनाविरूध्द आक्रमक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-कंत्राटदारांचे प्रलंबित देयके(बिल)व विविध मागण्याच्या पूर्ततेसाठी येत्या,२५ ऑगस्ट २०२५ रोजी मुख्य अभियंता नागपूर यांच्या कार्यालयासमोर सकाळी ११ वाजेपासून भिकमांगो आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती विदर्भ कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष नितीन डहाके यांनी गडचिरोली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात झालेल्या बैठकीदरम्यान दिली.
राज्यात सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत विविध विकास योजनांच्या माध्यमातून कंत्राटदारांच्या वतीने कोट्यवधी रुपयांची कामे करवून घेण्यात आली.कामे तर झालीत,मात्र शासनाने कंत्राटदारांची देयके प्रलंबित ठेवल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी ओढवली आहे.त्यामुळे राज्यातील सर्व कंत्राटदारांची प्रलंबित देयके देण्यासाठी शासनाने १० दिवसात निधी उपलब्ध करून द्यावा,राज्यातील सर्व विभागाची नविन प्रस्तावित कामे कंत्राटदाराची प्रलंबित देयके पूर्ण होईपर्यंत काढू नयेत,तसेच त्यांच्या निविदा प्रक्रिया राबवू नयेत,सर्व विभागाच्या प्रस्तावित नवीन कामांना शासनाच्या अर्थ विभागाकडून ५० टक्के निधिची तरतूद केल्याशिवाय व मंजूरी मिळ्याल्याशिवाय पुढील कोणतीही निविदा प्रक्रिया सुरू करू नये, कंत्राटदारांच्या थकीत देयकांसाठी तातडीने निधि मंजूर करावा,वेळोवेळी राज्यासह विदर्भातील कंत्राटदार संघटनेने निवेदने,निदर्शने व नारेबाजी केली,पण शासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही म्हणून विदर्भातील कंत्राटदार आक्रमक झाले आहेत.त्यामुळे मुख्य अभियंता नागपूर यांच्या कार्यालयासमोर भिकमांगो आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.कंत्राटदारांचा आरोप आहे की,मार्च २०२५ मध्ये फक्त ५ टक्के इतकाच निधी वितरित करण्यात आला असून त्यानंतर आजतागायत एकही रुपया मिळालेला नाही.अनेक निवेदने,आंदोलने करूनही शासनाने ठोस उपाययोजना केली नसल्याने कंत्राटदारांना रस्त्यावर उतरावे लागत आहे.या आंदोलनात नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर,वर्धा,यवतमाळ,वाशिम,गोंदिया,भंडारा, अमरावती,बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील शेकडो कंत्राटदार सहभागी होणार आहेत.
  •  कर्जाची परतफेड करणार कशी?👇

ज्यांना कोणतेही काम करता येत नाही,ते लोक भीक मागतात,आम्ही काम केले.पण पैसे मिळाले नाहीत. खिशातले पैसे कामावर खर्च केले.त्यानंतर व्याजाने  कर्जाची रक्कम घेतली.काम केल्यावर पैसे मिळतील  त्या रकमेतून सर्व हिशोब करायचा आहे. पण,कामावरील देयके अद्याप हातात मिळाली नाहीत.त्यामुळे कंत्राटदार कर्जबाजारी झालेले आहे व आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.त्यामुळे आता भीक मागितल्याशिवाय पर्याय नाही.कितेक महिने होऊनही बिलाची देयके मिळाली नाहित.त्यामुळे कंत्राटदार संतप्त झालेत.आणखी किती दिवस वाट बघायची असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.येत्या १० दिवसात प्रलंबित देयके मंजूर न झाल्यास राज्यातील काम बंद व संघर्ष अधिक तीव्र केला जाईल, असा इशारा यावेळी संघटनेतर्फे देण्यात आला.यावेळी उपस्थित विदर्भ कंत्राटदार संघटनेचे अजय तुम्हावार, भूषण समर्थ,मंगेश देशमुख,प्रणय खुणे,मनोज पवार, राहुल निलमवार,सागर निंबाडकर,रणछोड कलंत्री, लीलाधर भरडकर,नीलकंठ गावडे,श्री हुड्डा,प्रसाद कवाशे आदी कंत्राटदार उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज,मंगळवार २३ जून रोजी...

नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी निर्धारित मुदतीत वार्षिक विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन.. – अन्यथा दहा हजाराचा दंड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पिरिऑडिकल्स (पीआरपी)अधिनियम,२०२३ अंतर्गत नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ चे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र प्रेस...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!