Saturday, May 2, 2026
Homeगोंदियाइटियाडोह धरणाच्या पाणी पातळीत वाढ; सतर्कतेचा इशारा..!

इटियाडोह धरणाच्या पाणी पातळीत वाढ; सतर्कतेचा इशारा..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-राज्यासह विदर्भात दोन दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने नदी,नाले ओसंडून वाहू लागलेत.काही जिल्ह्यात ढगफुटी होऊन जनजीवन विस्कळित झाले आहे.अश्यातच हवामान खात्याने आणखी पुढील पाच ते सहा दिवस पावसाचा अंदाज वर्तविला आहे. मुख्यत्वे,रोवणी होऊन बरेच दिवस झाले.पण, पावसाअभावी जमिनीला भेगा पडल्याने धानपिक करपण्याच्या मार्गावर असतांनाच पाऊस सुरू झाला.परंतु,अपेक्षेप्रमाणे पाऊस न पडल्याने  पडणारा पाऊस शेतकऱ्यांसाठी आनंदाश्रू सोडत असला तरीही आणखी पाऊस पडला जावा,अशी अपेक्षा अनेक शेतकरी बांधव बाळगतांना दिसून येतात.त्यातच गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील इटियाडोह धरणाच्या पाणलोट क्षेत्रात व धरणात जोरदार पाऊस पडल्याने काल शनिवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास धरण शंभर टक्के भरले असून,ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे.त्यामुळे नदीकाठावरील गावांनी तसेच नदीपात्रातून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.विशेष करून पर्यटकांनी काळजी घ्यावी,जेणेकरून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

सहपालकमंत्र्यांच्या हस्ते बचत गटाच्या सहा महिला प्रभागसंघांना फिरत्या रेस्टॉरंटचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी 'उमेद' अभियान आणि जिल्हा प्रशासनाने एक अभिनव पाऊल उचलले आहे.महाराष्ट्र दिनाचे औचित्य...

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!