- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्यात अपघातांची मालिका संपता संपेना.नुकतेच ७ ऑगस्ट रोजी गडचिरोली-आरमोरी मार्गावरील काटली-साखरा गावानजीक एका ट्रकने तब्बल सहा अल्पवयीन शाळकरी मुलांना जोरदार धडक दिल्याने यात चार मुलांचा मृत्यू झाला होता,तर दोन मुले गंभीर जखमी झाल्याची हृदयद्रावक घटना घडली होती.अश्यातच आता आज,शनिवार १६ ऑगस्ट रोजी दुपारी साडे बारा वाजेच्या दरम्यान गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील गोविंदपूर गावाजवळ एका भरधाव वेगाने अनियंत्रित झालेल्या कारने उभ्या असलेल्या तीन दुचाकीस्वारांना जोरदार धडक दिल्याने अपघातात एकजण जागीच ठार झाला,तर तिघेजण गंभीर जखमी झाले.यात एकाचा पाय मोडल्याची माहिती आहे.विजय सुखदेव सातपुते वय ४८ वर्षे रा.गोविंदपूर ता.जि.गडचिरोली असे अपघातात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे.तर जखमींमध्ये १.२४ वर्षीय सुधाकर रमेश दुधबळे रा. नवेगाव रै.,ता.चामोर्शी,जि.गडचिरोली,२.देवेंद्र नामदेव भांडेकर वय ४२ वर्षे रा.नवेगाव रै.,ता.चामोर्शी जि.गडचिरोली,३.लता विजय सातपुते वय ४० वर्षे रा.गोविंदपूर,ता.जि.गडचिरोली अशी जखमींची नावे असून यातील देवेंद्र भांडेकर यांच्या एका पायाला गंभीर मार लागल्याने पायाची हाडे मोडली.
माहितीनुसार,आज शनिवारी दुपारी साडे बारा वाजेच्या दरम्यान एमएच ३१ ईए ३३६८ क्रमांकाची शेवरलेट कंपनीची कार ही चामोर्शी मार्गाहून गडचिरोलीकडे येत असतांना गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील गोविंदपूर गावाजवळ कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगत उभ्या असलेल्या तीन दुचाकीस्वारांना जाऊन धडकली.यात एकजण जागीच गतप्राण झाला,तर एकजण दुचाकी घेऊन रस्त्याच्या कडेला जाऊन शेतात कोसळला.घटना घडताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू करीत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.अपघाताची माहिती गडचिरोली पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
- Advertisement -

