Friday, October 16, 2026
Homeगडचिरोलीशेतीच्या वादावरून जिवे ठार मारणाऱ्या आरोपीस जन्मठेप- गडचिरोली  जिल्हा व सत्र न्यायाधीश,उदय बा.शुक्ल...

शेतीच्या वादावरून जिवे ठार मारणाऱ्या आरोपीस जन्मठेप- गडचिरोली  जिल्हा व सत्र न्यायाधीश,उदय बा.शुक्ल यांनी दिला न्यायनिर्णय-तत्कालीन तपासी अधिकारी रेगुंठा प्रभारी पोउपनि बाळासाहेब सूर्यवंशी यांनी केला होता गुन्ह्याचा तपास 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

डॉ. जगदीश वेन्नम

गडचिरोली :- मृतक नामे राजक्का व्यंकटी बोल्ले वय ५० वर्ष रा.रेगुंठा ता.सिरोंचा व राजक्काची दोन सुना ह्या ३ मार्च २०१९ रोजी आपल्या शेतात मुंग पेरणीचे काम करीत असतांना,त्याच गावातील आरोपी नामे समय्या अंकलु दुर्गम व त्याची पत्नी नामे लक्ष्मी अंकलु दुर्गम हे दोघे राजक्काच्या शेतात कुऱ्हाड घेवुन आले व त्यांना म्हणाले की,ही जमिन माझी आहे.असे बोलला असता,फिर्यादीची सासु त्यास म्हणाली की ही जमिन आमची आहे.आम्ही पैसे देवुन विकत घेतली आहे.असे बोलली असता समय्या दुर्गम याने त्याच्या हातातील कुऱ्हाड घेवुन राजक्काच्या अंगावर धावून आला व कुऱ्हाडीने डोक्यावर व छातीवर मारल्याने ती खाली पडली तेव्हा गळ्यावरही कुऱ्हाडीने वार केले. त्यावेळी मोनीका सासुला वाचविण्याकरीता आडवी आली असता मोनिकाच्या डोक्यावर व कमरेवर कुन्हाडीने वार केले.मोनिका सुध्दा खाली पडली तेव्हा ही घटना पाहुन फिर्यादी आपला जिव वाचविण्याकरीता पळ काढला असता समय्या दुर्गमची पत्नी हिने फिर्यादीचा पाठलाग करून तिला सुध्दा मारहाण केली व ती कशीतरी त्यांच्या तावडीतून सुटुन रोडवर आली व गावात जाऊन घडलेला सर्व प्रकार सासरे व्यंकटी बोल्ले यांना सांगून व पोलीस स्टेशन रेगुंठा येथे जाऊन सदर घटनेबाबत तक्रार दिली.

फिर्यादी नामे सी.राजेश्वरी सडवली बोल्ले यांनी दिलेल्या तक्रारी वरुन आरोपी विरोधात उप पोस्टे रेगुंठा अप.क्र. 06/2019 कलम 302, 307, 323, 109,506 भांदवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

पोलीस यंत्रणेने कौशल्यपूर्ण तपास करून आरोपी विरुध्द सबळ पुरावा मिळून आल्याने न्यायालयात से.के.क्र. 23/2020 अन्वये दोषारोप पत्र दाखल करण्यात आला.फिर्यादी व ईतर साक्षीदारांचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद न्यायालयाने ग्राहय धरून २ मार्च २०२३ रोजी आरोपी नामे समय्या अंकलु दुर्गम वय 46 वर्ष, रा.रेगुंठा ता.सिरोंचा याला  प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश,उदय बा.शुक्ल गडचिरोली यांनी कलम 302 अन्वये भांदवीमध्ये जन्मठेप व 25,000/- रूपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.

सरकार पक्षातर्फे सहा.जिल्हा सरकारी वकील एस.यु. कुंभारे यांनी कामकाज पाहिले तसेच गुन्ह्याचा तपास पोलीस उपनरीक्षक बाळासाहेब बी.सुर्यवंशी उपपोस्टे रेगुंठा यांनी केला.तसेच संबधीत प्रकरणात साक्षदारांशी समन्वय साधुन प्रकरणाची निर्गती करीता कोर्ट पैरवी अधिकारी व कर्मचारी यांनी खटल्याच्या कामकाजात योग्य भुमीका पार पाडली.

यातील आरोपी समया दुर्गम हे दुहेरी हात्यकांडा मध्ये सुमारे 10 वर्षांपूर्वी निर्दोष सुटला होता परंतु पुन्हा प्रत अश्याच प्रकारे केलेल्या गंभीर गुन्ह्यात त्याला जन्मठेप झाल्याने रेगुंठा परिसरातील नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.तत्कालीन तपासी अधिकारी,रेगुंठा प्रभारी अधिकारी पोलीस उपनरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी यांनी सदर गुन्ह्याचा तपास केला होता.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता तीन कल्याणकारी योजनांना इंदिरा गांधींच्या नावाऐवजी ‘प्रधानमंत्री’ शब्द..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.या पार पडलेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन कल्याणकारी योजनांची नावे...

गडचिरोली जिल्ह्यातील ९६ रेतीघाटांचे होणार लिलाव; सूचना व हरकती सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील वाळू व रेती उत्खननासाठी योग्य स्थळांचा समावेश असलेला सन २०२६-२७ चा प्रारूप जिल्हा सर्वेक्षण अहवाल नागरिकांच्या अवलोकनासाठी www.gadchiroli.gov.in या संकेतस्थळावर...

कारची सायकलला जोरदार धडक; सायकलस्वाराचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-रात्रीच्या सुमारास सायकलने घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्याला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सायकलस्वार शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर धडकेनंतर...

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मिळणार दिवाळीपूर्वीच दोन हजाराची भाऊबीज भेट..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी आनंदाची बातमी असून या सर्वांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!