उद्रेक न्युज वृत्त :-लाडकी बहीण योजनेंतर्गत दर महिन्यास मिळणारे दीड हजार रुपये जुलै महिना संपून आता ऑगस्ट महिन्यास सुरुवात झाली असतांनाही जमा न झाल्याने योजनेतील पात्र लाभार्थी महिला पैसे केव्हा जमा होणार,अशी आशा बाळगून आहेत.अश्यातच आता जुलै महिन्याच्या दीड हजार रुपये बाबत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी जुलै महिन्याचे दीड हजार रुपये रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच ८ ऑगस्ट रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.येत्या ९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असल्याने सरकारकडून पूर्वसंधेला लाडक्या बहिणींसाठी हप्त्याच्या रकमेची विशेष भेट दिली जाणार आहे.मागील वर्षी,एकत्रितपणे तीन हजार रुपये जुलै आणि ऑगस्टचे हफ्ते १७ ऑगस्ट २०२४ रोजी जमा झाले होते.त्यामुळे यंदाही जुलै आणि ऑगस्टचे दोन्ही हप्ते वितरीत करण्याबाबत अद्याप अधिकृत माहिती नसून दोन्ही महिन्यांचे लाभ एकत्रित वितरीत करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार जुलै महिन्याचे दीड हजार रुपये..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

