Wednesday, July 29, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता क्यूआर कोड स्कॅनरवरून माहीत पडणार डॉक्टर असली की नकली..!

आता क्यूआर कोड स्कॅनरवरून माहीत पडणार डॉक्टर असली की नकली..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यात एक लाख ९० हजार एमबीबीएस डॉक्टर असून त्यापैकी एक लाख ४० हजार डॉक्टरांनी त्यांची नोंदणीची नूतनीकरण प्रक्रिया पूर्ण केली आहे.डॉक्टरांबाबत कोणतीही माहिती नसतांना नागरिक डॉक्टरांचा फलक पाहूनच कोणत्याही क्लिनिकमध्ये उपचारासाठी जातात. बनावट पदवी असलेल्या डॉक्टरांकडून औषधे घेतल्याने रुग्णांना अनेकदा शारीरिक आणि आर्थिक नुकसान सहन करावे लागते.अशा बनावट डॉक्टरांपासून सुटका मिळवण्यासाठी आणि योग्य डॉक्टर ओळखण्यासाठी, एमएमसीने ‘नो युवर डॉक्टर’ मोहीम सुरू केली होती. काऊन्सिलकडून नो युवर डॉक्टर मोहिमेअंतर्गत डॉक्टरांना क्यूआर कोड दिले जात आहेत.क्यूआर कोड स्कॅन केल्यावर डॉक्टरांची पदवी,नोंदणी इत्यादी माहिती उपलब्ध होते.या अंतर्गत,सर्व एमबीबीएस डॉक्टरांना क्यूआर कोड घेण्यास सांगितले होते,परंतु चार महिन्यांत केवळ १० हजार डॉक्टरांनी क्यूआर कोड घेतला आहे.पण राज्यातील सर्व एमबीबीएस डॉक्टरांना क्लिनिकमध्ये क्यूआर कोड लावणे अनिवार्य करण्याच्या दिशेने एमएमसीने पावले उचलली आहेत.महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे प्रशासक डॉ.विकी रुघवानी म्हणाले की, आतापर्यंत क्यूआर कोड नियम ऐच्छिक ठेवण्यात आला होता,परंतु आता तो अनिवार्य केला जाईल. यासाठी एक प्रस्ताव तयार करून राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाकडे मंजुरीसाठी पाठवला जाईल.प्रस्ताव मंजूर होताच,एमएमसी डॉक्टरांना पुन्हा क्यूआर कोड बसवण्यासाठी नोटीस बजावेल.क्यूआर प्रणालीकडे दुर्लक्ष करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्यात येईल.त्यामुळे आता येत्या काळात डॉक्टरांना दिलेल्या क्यूआर कोड स्कॅनरवरून माहीत पडणार डॉक्टर असली की नकली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तुकाराम मुंढेंनी शाळा व्यवस्थापनावर सोपवली मोठी जबाबदारी; विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी विविध निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या धडक कारवाईचे सत्र सुरू असतांनाच आता अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी...

माझा वाढदिवस-एक झाड उपक्रम; देसाईगंज आदर्श महाविद्यालयाच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा आणि वृक्षारोपणाची सवय प्रत्येकामध्ये रुजावी या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,देसाईगंज येथे "माझा वाढदिवस-एक झाड" हा...

राज्यांतर्गत पिकस्पर्धा; आता शेतकऱ्यांना घरबसल्या अर्ज करण्याची सुविधा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी तसेच प्रयोगशील व प्रगतशील शेतकऱ्यांच्या कार्याचा गौरव करून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने...

राज्य सरकार म्हणतेय; गौण खनिजांच्या अवैध उत्खनन आणि वाहतुकीवर दहापट दंड आकारू.. -चोर खरोखरच चोऱ्या करणे सोडणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-गौण खनिजांची चोरी करणे ही काही चोरट्यांसाठी नित्याचीच बाब झाली आहे.काहींना अवैध रेती,मुरूम,दगड,माती व इतर गौण खनिजांची चोरी केल्याशिवाय चैनच पडेनासे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!