- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :- “अरे त्याचा कोणी काहीही करूच शकत नाही; तो एवढा मोठा धंदा करतो त कां असाच करतो कां.? त्याचे वरपासून खालपर्यंत सर्वच बांधलेले आहेत; तुम्ही कितीही तक्रार करा; पण तो आपलीच खरी करेल” असे नाना तऱ्हेचे बोलबच्चन एखाद्या पानठेल्यात,एखाद्या चौकात वा इकडे-तिकडे अनेकांकडून ऐकायला मिळतात.पण,प्रत्यक्षात कृती करण्याची कुणामध्ये हिंम्मत नाही की,खरोखरच समोरील व्यक्ती एवढा पॉवरवाला आहे काय? एखादा अधिकारी,कर्मचारी जरी पैसे घेत असेल,पण त्याला काहीतरी प्रक्रिया पार पाडावीच लागते.थातुरमातुर प्रक्रिया पार पाडल्यास त्यांचे वरिष्ठ आहेत की.मात्र,आम्ही फुकटच्या बाता झोडण्यात मग्न असतो.आजच्या घडीला प्रत्यक्ष कृती करणाऱ्याचे पटकन काम होत असते.हेही तितकेच खरे.अश्यातच नागपूर जिल्ह्याच्या एका शेतकऱ्याने दोन कृषी सेवा केंद्रांमध्ये युरियाचा साठा उपलब्ध असतांना दोन्ही केंद्र चालकांनी युरिया विकत देण्यास स्पष्ट नकार दिल्याने शेतकऱ्याने तालुका कृषी अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल केल्याची घटना उघडकीस आली आहे.याला म्हणतात प्रत्यक्षात कृती.रमेश पांडुरंग ठोंबरे रा. सावरगाव,ता.नरखेड,जि.नागपूर असे तक्रारकर्त्या शेतकऱ्याचे नाव आहे.
सावरगाव येथील शेतकरी रमेश ठोंबरे यांना पिकांसाठी युरियाच्या खताच्या दोन बॅग हव्या होत्या.त्यामुळे ते बुधवारी २३ जुलैच्या रात्री साडे सात वाजताच्या सुमारास युरिया खरेदी करण्यासाठी गावातील एका कृषी सेवा केंद्रात गेले.त्या कृषी सेवा केंद्रमालकाने त्यांना युरिया देण्यास नकार देत दुसऱ्या दुकानात पाठविले.दुसऱ्या कृषी सेवा केंद्रमालकानेही त्यांना युरिया देण्यात नकार दिला.त्यामुळे शेतकऱ्याने तालुका कृषी अधिकारी कार्तिक कोळी यांच्याकडे काल,गुरुवारी लेखी तक्रर केली.विशेष म्हणजे,या दोन्ही दुकानांमध्ये युरियाचा साठा उपलब्ध असून युरिया (नत्र)च्या कमतरतेमुळे आपल्या शेतातील पिकाचे नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी या दोन्ही कृषी सेवा केंद्रमालकांची असेल,असे त्यांनी तक्रारीत नमूद केले.त्यांनी या दोन्ही दुकानात बुधवारी व गुरुवारी युरियाचा किती साठा उपलब्ध होता,याचीही माहिती तालुका कृषी अधिकाऱ्यांना मागितली आहे.
बहुतांश दुकानदार रासायनिक खते लिकिंग करून विकत असल्याने त्यांच्यावर कृषी विभागाकडून कारवाई देखील केली जाते.त्याला पर्याय म्हणून काही दुकानदार अधिक मागणी असलेल्या कृषी निविष्ठा इतर ग्राहकांना विकण्याऐवजी त्यांच्या नियमित ग्राहकांसाठी राखून ठेवतात.कारण,नियमित ग्राहकांमुळे त्या दुकानदारांचे बियाणे,खते, कीटकनाशके व इतर साहित्य विक्रीचे टार्गेट पूर्ण होण्यास मदत होते.इतर दुकानदारांचे नियमित ग्राहक तोडून आपल्याशी जोडण्याचा हा नवा फंडा आहे.
- रमेश ठोंबरे,शेतकरी-सावरगाव👇
मी बुधवारी रात्री सावरगाव येथील ठोंबरे व काळे यांच्या कृषी सेवा केंद्रांमध्ये युरिया खरेदी करण्यासाठी गेलो होतो.या दोघांनी मला युरिया विकत देण्यास नकार दिला.युरियाच्या कमतरतेमुळे माझ्या पिकांचे नुकसान होऊ शकते.त्यामुळे मी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.
- Advertisement -