Thursday, June 25, 2026
Homeगडचिरोलीदुरुस्तीसाठी आलेल्या बंदुकांचा वापर चोरीसाठी.. -धानोरा तालुक्यातील तिघांना तर एकाला छतीसगडहून...

दुरुस्तीसाठी आलेल्या बंदुकांचा वापर चोरीसाठी.. -धानोरा तालुक्यातील तिघांना तर एकाला छतीसगडहून अटक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-छत्तीसगड राज्याच्या एका इसमाने दुरुस्तीसाठी दिलेल्या दोन बांदुकांचा वापर चोरीसाठी करण्यात आलेल्या तिघांना धानोरा तालुक्यातून तर एकाला छत्तीसगडहून अटक करण्यात आली आहे.
अशोक सुखराम बोगा,वय ३० वर्षे,घुमनसाय बैजुराम गावडे वय ३३ वर्षे,सुकालु आसाराम कोमरा वय ३२ वर्षे,तीघेही रा.गजामेंढी,ता.धानोरा,जि.गडचिरोली व बसंतकुमार कल्लो वय ४१ वर्षे,रा.नवागाव कोंडल, ता.दुर्ग,जि.कांकेर,छत्तीसगड याच्यासह चारही आरोपीस अटक करुन धानोरा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २६ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.आरोपींकडून दोन नग देशी बनावटीच्या बंदुक,११ नग काडतुस फिर्यादीचा चोरीस गेलेला मोबाईल व गुन्ह्यात वापलेली मोटारसायकल जप्त केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,रामभरोस सिताराम नामक ट्रक चालकाचा धानोरा तालुक्यातील  सावरगाव-मुरुमगाव मार्गावर ट्रक चिखलात फसला.ट्रक बाहेर निघत नसल्याने त्याने रात्र झाली म्हणून ट्रकच्या कॅबीनमध्येच रात्र काढण्याचे ठरवले. रात्री झोपेत असतांना मध्यरात्रीच्या सुमारास तीन अज्ञात इसमांनी ट्रक चालकास ट्रकच्या कॅबीनमधून उठवून बंदुकीचा धाक दाखवत ट्रकमधून डिझेल काढून देण्यासाठी धमकी दिली.डिझेल काढता न आल्याने आरोपींनी ट्रक चालकाच्या छातीवर व डोक्यावर दोन बंदुक ठेवून मोबाईल घेतला व पसार झाले.त्यानुसार ट्रक चालकाने मुरुमगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.घटनेचे गांभीर्य लक्षात घेता गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी तपास करण्याचे आदेश सावरगाव पोलीसांना दिले होते. सावरगाव पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक विश्वंभर कराळे आणि पोलीस पथकाने तांत्रिक पुराव्यांच्या आधारे गजामेंढी येथील तिघांना ताब्यात घेतले.त्यानुसार सदर प्रकरणाचे बिंग फुटले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बहिणीचा छळ असह्य; जावयाचा साळ्यानेच केला खून.. – ५० हजाराची दिली सुपारी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-गेल्या सहा वर्षापासून बहिणीचा छळ करीत असल्याच्या रागातून ५० हजाराची सुपारी देत चक्क साळ्यानेच जावयाचा गेम बजावला असल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात...

सावधान..! जिल्हा परिषद शाळांतील परिचर भरतीची सोशल मीडियावरील जाहिरात बनावट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सोशल मीडियावर जिल्हा परिषद शाळांमध्ये परिचर(Peon)पदभरतीसंदर्भात प्रसारित होत असलेली जाहिरात पूर्णपणे खोटी,बनावट आणि दिशाभूल करणारी असल्याचा अधिकृत खुलासा जिल्हा परिषदेचे मुख्य...

वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसवा; अन्यथा १ जुलैपासून दंडात्मक कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट(HSRP)बसविणे बंधनकारक केले आहे.या कामासाठी शासनाने...

बापरे..! जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यतेचे आदेश.. – चक्क जिल्हाधिकाऱ्यांचे पोलीस अधीक्षकांना कारवाईचे पत्र..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा खनिज प्रतिष्ठान(डीएमएफ) गडचिरोली यांच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यता आदेश तयार करून प्रसारित करण्यात आल्याच्या गंभीर प्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!