Monday, April 27, 2026
Homeगडचिरोलीशेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; दुसऱ्या टप्प्यातील बोनसचा मार्ग सुकर.. - आमदार रामदास...

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; दुसऱ्या टप्प्यातील बोनसचा मार्ग सुकर.. – आमदार रामदास मसरामांनी विधानसभेत मुद्दा केला उपस्थित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून शासनाच्या बोनस योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील धानाच्या बोनसची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच जमा होणार आहे.आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी विधानसभेत शेतकऱ्यांच्या धानाच्या बोनस बाबत शासनाचे लक्ष वेधले.त्यानुसार उर्वरित धान बोनसच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आठवडाभरात बोनस वाटपाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.गडचिरोली जिल्ह्यातील एकूण ९५ हजार शेतकऱ्यांना बोनसचा थेट लाभ मिळणार आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ४५ हजार शेतकऱ्यांना याआधीच बोनसचे वाटप करण्यात आले आहे.तर आता उर्वरित शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यातील लाभ देण्यात येणार आहे.
शासनाकडून एकूण २२५ कोटी रुपयांच्या बोनस रकमे पैकी सध्या १२० कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. यापैकी १०४ कोटी रुपये काल शनिवार पर्यंत वाटप करण्यात आले असून उर्वरित रक्कम उद्या,सोमवार १४ जुलै पासून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे.याशिवाय, शासनाने एकूण बोनस रकमेपैकी ५० टक्के रक्कम वितरित केली असून उर्वरित रक्कम प्राप्त झाल्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांना तात्काळ वाटप करण्यात येणार आहे.शासनाने हेक्टरी २० हजार रुपये प्रमाणे जास्तीत जास्त दोन हेक्टरसाठी बोनस देण्याचे धोरण आखले आहे. यामुळे एका शेतकऱ्याला ४० हजार रुपयांपर्यंतचा लाभ मिळू शकतो.शेतकऱ्यांच्या हितासाठी सतत पाठपुरावा करणारे आमदार रामदास मसराम यांनी विधानसभेत या मुद्द्यावर सरकारला जाब विचारताच प्रशासकीय यंत्रणा सक्रिय झाली असून धनादेश वाटप व बँक हस्तांतरण प्रक्रियेला वेग आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कारखान्यात आढळून आले बालकामगार; संचालकासह चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखादी कंपनी असो वा कुठलेही दुकान, हॉटेल,ढाबे,चहाची दुकाने वा इतर आस्थापनांमध्ये बालकांना कामावर ठेवणे गंभीर गुन्हा आहे.यात १४ वर्षे वयाखालील मुलांचा...

आता लग्न पत्रिकेवर टाकावी लागणार जन्मतारीख..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात अजूनही विशेषतः ग्रामीण आणि काही दुर्गम भागात छुप्या पद्धतीने बालविवाह लावले जातात.अनेकदा मुलगी अल्पवयीन असतांनाही तिचे लग्न लावून...

उन्हाचा तडाखा; फिटनेस सर्टिफिकेट नूतनीकरण व ड्रायव्हिंग लायसन्स चाचणीच्या वेळेत तात्पुरता बदल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात वाढलेल्या उष्माघाताच्या घटनांचा विचार करता नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण(फिटनेस सर्टिफिकेट रेनेवल)तसेच पक्की अनुज्ञप्ती(ड्रायव्हिंग लायसन्स)चाचणीच्या...

३० वर्षीय महिलेची दिराने धारदार शस्त्राने गळा चिरून केली हत्या; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात आज,सोमवार २७ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास एक भयावह आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली.नात्यातील दिरासोबत विवाह समारंभासाठी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!