Saturday, August 29, 2026
Homeगोंदियाअन् ....पगारासाठी 'तो' चढला पिंपळाच्या झाडावर....- गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तहसील कार्यालय परिसरातील...

अन् ….पगारासाठी ‘तो’ चढला पिंपळाच्या झाडावर….- गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तहसील कार्यालय परिसरातील घटना….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गोंदिया (आमगाव) :- आपल्याला पगार मिळावा; यासाठी आमगाव तहसील कार्यालयातील शिपायाने काल सोमवारी २७ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास चक्क पिंपळाच्या झाडावर चढून वीरूगिरी केल्याने त्याला पाहण्यासाठी तहसील कार्यालयात तोबा गर्दी झाली होती.

सविस्तर वृत्त असे की,अर्जुनी-मोरगाव तालुक्यात कोतवाल म्हणून कार्यरत असलेल्या राकेश बोरकर याची सेवाज्येष्ठतेनुसार ऑगस्ट २०२२ मध्ये पदोन्नती झाली.त्याला आमगाव तहसील कार्यालयात शिपाई पदावर नियुक्ती देण्यात आली.परंतु काम करीत असतांना त्याला सहा महिन्यांपासून एकही रुपयाचे पगार दिले गेले नाही.महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आपल्याला वेतन मिळाले नाही,असे गृहीत धरून त्याने २७ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास तहसील कार्यालयातील पिंपळाच्या झाडावर चढला.झाडावर चढलेला पाहून लोकांची आरडाओरड झाली.परिणामी पाहण्यासाठी तहसील कार्यालयात तोबा गर्दी झाली.तुझी मागणी मान्य होईल,असे सांगताच तो खाली उतरला.पगार देण्याच्या मागणीला घेऊन झाडावर चढलेला राकेश बोरकर हा अवघ्या दहा मिनिटातच झाडावरून उतरला.नंतर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी त्याला आमगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळेत राखी मेकिंग स्पर्धा व रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न.. -विद्यार्थ्यांनी देसाईगंज पोलिस बांधवांना राखी बांधून व्यक्त केली...

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या 'पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनी वडसा' येथे आज,शनिवार २९ ऑगस्ट रोजी 'एक राखी देशाचे...

पोलीस दलात खळबळजनक घटना..! पोलीस उपनिरीक्षकाने धावत्या रेल्वे समोर घेतली उडी; घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच १६ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय)यांनी शासकीय निवासस्थानी गळफास...

देसाईगंज तालुक्यात रोजगार हमीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार.. – काम न करताच उचलली लाखो रुपयांची बिले..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यात यंत्रणा स्तरावरून करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये मोठा कथित भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या...

सर्व अन्न विक्रेते व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक.. – पाणीपुरी पासून ते चहा विक्रेते व इतर परवाना नसणाऱ्यांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-अन्न व्यावसायिक विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ३१ अंतर्गत परवाना घेणे किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!