- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-एका रुग्णाला गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयातून नागपूरला नेत असतांना वाटेतच १०८ क्रमांकाच्या धावत्या रुग्णवाहिकेला अचानकपणे आग लागली.अश्यातच चालकाच्या सतर्कतेने रुग्ण, नातेवाईक आणि डॉक्टर सुखरूप बचावले.मात्र, घडलेल्या घटनेत रुग्णवाहिका पूर्णपणे जळून खाक झाली असल्याची घटना काल,शनिवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास उमरेड-भिवापूर राष्ट्रीय महामार्गावरील गोंडबोरी फाटा परिसरात घडली.
माहितीनुसार,गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयातून अतुल लोणारेया या जखमी रुग्णाला नागपूरला हलविण्यासाठी १०८ रुग्णवाहिका क्रमांक-
एमएच १४ सी एल ०५१७ राष्ट्रीय महामार्गावरून
जात असतांना,गोंडबोरी शिवारात वाहनातून धूर निघतांना दिसला.चालक संघशील खुशाल उंदीरवाडे वय ३० वर्षे रा.येनापूर यांनी प्रसंगावधान राखत वाहन थांबवले आणि रुग्णवाहिकेत असलेल्या सर्वांना सुरक्षितरित्या खाली उतरवले.त्यानंतर रुग्णवाहिकेला काही अंतरावर घेऊन जात महामार्गाच्या कडेला उभी केली असता काही क्षणांतच वाहनाने पेट घेतला आणि आगीचा डोंब उसळला.यानंतर उमरेड आणि भिवापूर येथून अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. भिवापूर पोलिस ठाण्याचे ठाणेदार जयप्रकाश निर्मल, पोलीस उपनिरीक्षक संदीप सडमेक,आकाश महाकाळ, सुरेखा बिडकर आणि इतर पोलिस कर्मचारी तसेच रमेश येडे,किशोर डेकाटे,रवी वानखेडे,वासू समर्थ,सतीश राघोर्ते,अयुब पठाण यांनी शर्थीचे प्रयत्न करून मोठी दुर्घटना टाळली.मात्र,आगीवर नियंत्रण मिळेपर्यंत रुग्णवाहिका पूर्णतः जाळून खाक झाली होती.आगीचे लोळ आणि धुरामुळे राष्ट्रीय महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती.सुमारे अर्धा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.वाहनात असलेल्या ऑक्सिजन सिलिंडरपैकी एकाचा स्फोट झाल्याने सदरची दुर्घटना झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
- Advertisement -

