- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
तालुका प्रतिनिधी/विनायक राखडे
अर्जुनी/मोरगाव(गोंदिया) :-गोंदिया जिल्ह्यातील विविध प्रकारच्या अनियमितता,गैरव्यवहार आणि कायदेशीर बाबींकडे दुर्लक्षामुळे जिल्ह्यातील सुमारे ५ हजारांहून अधिक संस्था केवळ कागदावरच सुरू असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.या पार्श्वभूमीवर सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयाने तपासणी मोहीम सुरू केली असून अनेक संस्थांना नोटीसा बजावल्या आहेत.या नोटीसांमुळे गोंदिया जिल्ह्यातील संस्थामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.धर्मादाय आयुक्त कार्यालयाने जिल्ह्यातील गोंदिया,तिरोडा,आमगाव,अर्जुनी/मोरगाव,सालेकसा, देवरी,सडक/अर्जुनी,गोरेगाव यांसारख्या तालुक्यांमध्ये कार्यरत संस्थांची तपासणी सुरू केली आहे.विशेषतः शासकीय सवलतींचा लाभ घेतलेल्या संस्थांकडे अधिक लक्ष केंद्रित केले जात आहे.यात बऱ्याच संस्था केवळ नावापुरत्या कार्यरत असून शासनाच्या अनेक निधीवर डल्ला मारीत असल्याची माहिती सहाय्यक धर्मदाय आयुक्त दिशा पजई यांनी दिली आहे.जिल्ह्यातील हजारो संस्थांनी मागील काही वर्षांपासून धर्मादाय कायद्यानुसार विश्वस्त बदल अर्ज,संस्थेच्या मालमत्ता जाणूनबुजून अभिलेखावर घेतल्या नाहीत,वार्षिक उत्पन्न खर्चाचा लेखा तपशील वर्षानुवर्षे जमा केलेला नाही.तसेच धर्मादाय आयुक्तांच्या परवानगीशिवाय परस्पर कर्ज घेणे वा संस्थेच्या मालमत्तेची विल्हेवाट लावली जात असल्याचे देखील चौकशीत स्पष्ट झाले आहे.याप्रकरणी कागदपत्रांची पडताळणी करुन कारवाई केली जाणार असल्याची माहिती सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांनी दिली आहे.तर ज्या संस्था धर्मादाय कायद्याचे उल्लंघन करीत आहेत,अशा संस्थांना प्रथम नोटिसा पाठवून योग्य त्या कागदपत्रांची मागणी करण्यात येत आहे.जे संस्था प्रमुख किंवा विश्वस्त वारंवार सूचना देऊनही सहकार्य करत नाहीत त्यांच्यावर महाराष्ट्र विश्वस्त कायद्याप्रमाणे योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार तसेच काही संस्थांनी धर्मादाय कार्यालयच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार केले असून त्यात पारदर्शकता नसल्याचे सुध्दा पुढे आले आहे.विशेषतः शैक्षणिक संस्था काही संस्था धर्मादाय उत्पन्नाचा वापर संस्था चालवण्यासाठी न करता वैयक्तिक हितासाठी करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.तर गोंदिया जिल्ह्यात १२ हजारांहून अधिक संस्था धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणीकृत आहेत.या संस्थांमध्ये मंदिर, मशीद,चर्च,शाळा,महाविद्यालय,हॉस्पिटल,
वृध्दाश्रम,अनाथाश्रम आणि अन्य प्रकारच्या सामाजिक संस्थांचा समावेश आहे.परंतु त्यातील काही संस्था प्रत्यक्षात केवळ कागदावरच अस्तित्वात असल्याने अशा संस्था वार्षिक उत्पन्नाचे अचूक लेखाजोखे देखील सादर करत नाहीत आणि धर्मादाय कायद्याची सरळसरळ पायमल्ली करत आहेत.आता अशा संस्थांवर काय कारवाई केली जाते,हे येत्या काळात स्पष्ट होणार असल्याने याकडे सर्वांच्या नजरा भिडल्या आहेत.
- Advertisement -

