Wednesday, July 15, 2026
Homeगडचिरोली‘भारत गौरव टुरिस्ट ट्रेन’ उपक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील ५० शिवप्रेमी मुंबईकडे रवाना..

‘भारत गौरव टुरिस्ट ट्रेन’ उपक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील ५० शिवप्रेमी मुंबईकडे रवाना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याचा गौरव करणाऱ्या ‘भारत गौरव टुरिस्ट ट्रेन’ उपक्रमांतर्गत आय.आर.सी.टी.सी.व महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने सुरु होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज सर्किट यात्रेत गडचिरोली जिल्ह्यातून निवडण्यात आलेले ५० शिवप्रेमी,युवक,विद्यार्थी व इतिहास प्रेमी मुंबईकडे रवाना झाले.या गौरवशाली यात्रेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात हिरवी झेंडी दाखवून ट्रॅव्हल्सद्वारे नागपूर व तिथून रेल्वेने मुंबईला रवाना करण्यात आले.सदर यात्रेचा मुख्य उद्देश म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण किल्ले आणि त्या परिसरातील धार्मिक स्थळांचे दर्शन घडविणे,त्यांच्या कार्याचे स्मरण आणि प्रेरणा घेणे असा आहे.राज्याच्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून आज, सोमवार ९ जून २०२५ रोजी मुंबई सीएसएमटी स्थानकावरून पहिली विशेष ट्रेन सुटणार असून,ती शिवप्रेमींसाठी एक ऐतिहासिक अनुभव ठरणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यातून या यात्रेत सहभागी होणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा तसेच निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.त्यांनी जिल्ह्यातील युवकांना या ऐतिहासिक यात्रेमध्ये सहभागासाठी प्रेरित केले. ‘भारत गौरव यात्रा’ हा उपक्रम केवळ पर्यटन नसून शिवचरित्राच्या माध्यमातून प्रेरणा घेण्याचा,इतिहासाची जाणीव करून देण्याचा एक प्रयत्न आहे.गडचिरोली जिल्ह्यातील प्रतिनिधीनीही या महत्त्वपूर्ण यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्याच्या विविध भागात पाऊस करणार दमदार एंट्री..

उद्रेक न्युज वृत्त :- 'नैसर्गिक आपत्तीस मंडळ जबाबदार राहणार नाही' अश्या म्हणण्याप्रमाणे पावसाचे काही खरे नाही.कुठे मुसळधार पडतो तर कुठे पाण्याचा एक थेंबही पडत नाही.त्यातच...

आता राज्यभरातील धनादेश अनादराची प्रकरणे परस्पर सामंजस्याने निघणार निकाली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये निगोशिएबल इन्स्ट्रुमेन्ट्स ॲक्ट,१८८१ च्या...

आजपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७ (१) व (३)अन्वये संपूर्ण गडचिरोली...

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!