- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-अगोदरच देसाईगंज तालुक्यात अवैध रेती चोरीने धुमाकूळ घातलेला असतांनाच आता त्यात आणखी एका गौण खनिजाची भर पडून अवैध मुरूम तस्करीचा धुमाळा देसाईगंज शहरासह ग्रामीण भागातील मुरूम चोरट्यांनी चालवला आहे.शहरातील दोन टीम तर ग्रामीण भागातील तीन ते चार टीम सक्रिय असून अश्यांचा शासनाची गौण खनिज चोरी करण्याचा गोरखधंदा झाला आहे.त्यामुळे शासनाच्या महसुलास लाखो रुपयांचा चुना लावल्या जात आहे.असे असतांनाही महसूल विभाग झोपेचे सोंग घेतांना दिसून येत आहे.त्यातच अगदी पोलिस स्टेशनच्या समोरून बेधडकपणे अवैध गौण खनिजाची वाहतूक सुरू असतांनाही यावर कुणाचेही लगाम नसल्याचे दिसून येत आहे.
मुरूम चोरीत वाहतूक पास एक तर अवैध मुरूम वाहतूक अनेक.यात अधिकारी,कर्मचाऱ्यांवर पाळत ठेवून रोजिची माणसे नेमून सूत्रे हलविण्यात येतात. त्यातच महसूल विभागाच्या काही कर्मचाऱ्यांचेही अभय असते.महसूल विभागाची कारवाई पाहिजे त्या प्रमाणात होत नसल्याने दिवसेंदिवस मुरूम चोरट्यांची हिंमत वाढतच चालली आहे.मुरूम गौण खनिज चोरी करणाऱ्यांकडे जेसीबी, कृषी प्रयोजनार्थ घेतलेले ट्रॅक्टर यांची फार मोठी यंत्रणा असल्याने शहरातील तसेच तालुक्यातील मोठ्या ठिकाणी मुरूम टाकण्यासाठी टोळ्या सक्रिय आहेत. विशेष म्हणजे जे मुरूम चोरतात.ते वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आहेत.अश्यातच सिटी आणि अर्बन क्षेत्रातील अवैध मुरूम चोरटे ‘चोरीला मामला अन् मुरुमाचा ट्रॅक्टर एकझॅक्ट लोकेशनवर थांबला’ असे करून विविध ठिकाणची जागा पोखरू लागले आहेत. असे कृत्य करणाऱ्यांकडून अनेकांचे हात ओले होत असल्याची चर्चा सर्वत्र दबक्या आवाजात नाही,तर मोठ्या आवाजात सुरू आहे.
- Advertisement -

