Sunday, August 16, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता पोलीस अधिकाऱ्यांवरील ताण होणार कमी.. - पोलीस हवालदारही करणार गुन्ह्यांचा...

आता पोलीस अधिकाऱ्यांवरील ताण होणार कमी.. – पोलीस हवालदारही करणार गुन्ह्यांचा तपास..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-पूर्वी गुन्ह्यांचा तपास करण्याचे अधिकार केवळ पोलिस उपनिरीक्षक पदापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे होते.त्यामुळे पोलीस ठाण्यातील कितीतरी प्रकरणे प्रलंबित राहून अधिकाऱ्यांवरील ताण वाढू लागला होता.अशातच ग्रामीण भागात अपुऱ्या मनुष्यबळाबरोबरच अधिकाऱ्यांची संख्या देखील कमी आहे.अशा परिस्थितीत गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाणही कमी असल्याचे निदर्शनास आल्याने गृहखात्याने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता पोलीस हवालदार म्हणजेच पोलिस हेड कॉन्स्टेबललाही गुन्ह्यांचा तपास करण्याचे अधिकार गृह विभागाने दिले आहेत.त्यानुसार पोलिस वरिष्ठ हवालदारांनाही गुन्ह्याचा तपास करता येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने मागील आठवड्यात राजपत्र जारी करत याबाबतची माहिती दिली आहे.मात्र,त्यासाठी काही अटीही घालण्यात आल्या आहेत.पोलिस हेड कॉन्स्टेबल हा पदवीधर असावा,सात वर्षे सेवा पूर्ण केलेली असावी तसेच नाशिक येथील गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालयात सहा आठवड्याचे विशेष प्रशिक्षण पूर्ण व परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.पोलिस दलातही उच्चशिक्षित तरुण भरती झाल्याने त्यांच्या अनुभवाची दखल घेऊन,त्यांच्याकडे छोट्या गुन्ह्यांचा तपास देण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. यामुळे अधिकाऱ्यांवरील ताण काही प्रमाणात कमी होईल.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आदर्श शाळांची संख्या वाढविण्यासोबतच विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यावर भर-राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-एकेकाळी मागास आणि नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून पाहिल्या जाणाऱ्या गडचिरोलीची ओळख आता वेगाने बदलत असून संपूर्ण देशाचे लक्ष या जिल्ह्याकडे वेधले जात...

तुकाराम मुंढेंचा बॉलिवूडच्या बड्या कलाकारांना दणका..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बॉलिवूड सिनेसृष्टीतील तीन बड्या कलाकारांना मोठा दणका दिला आहे.नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या पान...

पोलीस विभागात खळबळ; सहाय्यक पोलिस निरीक्षकाने संपवली जीवनयात्रा..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेल्या एका सहाय्यक पोलिस निरीक्षकाने(एपीआय) पीसीएमटीच्या शासकीय निवासस्थानी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची...

गडचिरोलीतील रस्त्यांसाठी सुमारे २ हजार ६०० कोटींचा भरीव निधी; पायाभूत सुविधांच्या विकासाला गती.. – पोलीस जवानांचे योगदान अविस्मरणीय- ॲड.आशिष जयस्वाल

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोलीच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासोबत जिल्ह्याचा समृद्ध नैसर्गिक व सांस्कृतिक वारसा जपत स्थानिकांना जिल्ह्यातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर शासनाचा भर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!