Sunday, August 16, 2026
Homeगडचिरोलीआरमोरी तालुक्यातील जंगली हत्तीच्या हल्ल्यात जखमी महिलेस सहपालकमंत्र्यांच्या हस्ते ५० हजाराची मदत..

आरमोरी तालुक्यातील जंगली हत्तीच्या हल्ल्यात जखमी महिलेस सहपालकमंत्र्यांच्या हस्ते ५० हजाराची मदत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-आरमोरी तालुक्यातील मानापुर (देलनवाडी) येथील रहिवासी इंदिराबाई सहारे यांना रानटी हत्तीच्या हल्ल्यात नुकतेच गंभीर दुखापत झाली होती.सध्या त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय आरमोरी येथे उपचार सुरू आहे.या उपचारादरम्यानच राज्याचे वित्त व नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी आज,गुरुवार १५ मे रोजी रुग्णालयात प्रत्यक्ष भेट देत त्यांच्याशी संवाद साधला आणि आस्थेने त्यांच्या तब्येतीची विचारपूस करून वनविभागातर्फे नुकसानभरपाई म्हणून ५० हजार रुपयांचा धनादेश दिला.सहारे यांच्या उपचारात कोणतीही कमतरता राहू नये,यासाठी ॲड.जयस्वाल यांनी वनविभाग व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले.वन्य प्राण्यांमुळे झालेल्या हानीबाबत नुकसानग्रस्त नागरिकांना त्वरित मदत देण्यात यावी.यामध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई सहन केली जाणार नाही, असेही जयस्वाल यांनी स्पष्ट केले.या प्रसंगी आमदार रामदास मसराम यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आदर्श शाळांची संख्या वाढविण्यासोबतच विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यावर भर-राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-एकेकाळी मागास आणि नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून पाहिल्या जाणाऱ्या गडचिरोलीची ओळख आता वेगाने बदलत असून संपूर्ण देशाचे लक्ष या जिल्ह्याकडे वेधले जात...

तुकाराम मुंढेंचा बॉलिवूडच्या बड्या कलाकारांना दणका..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बॉलिवूड सिनेसृष्टीतील तीन बड्या कलाकारांना मोठा दणका दिला आहे.नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या पान...

पोलीस विभागात खळबळ; सहाय्यक पोलिस निरीक्षकाने संपवली जीवनयात्रा..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेल्या एका सहाय्यक पोलिस निरीक्षकाने(एपीआय) पीसीएमटीच्या शासकीय निवासस्थानी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची...

गडचिरोलीतील रस्त्यांसाठी सुमारे २ हजार ६०० कोटींचा भरीव निधी; पायाभूत सुविधांच्या विकासाला गती.. – पोलीस जवानांचे योगदान अविस्मरणीय- ॲड.आशिष जयस्वाल

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोलीच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासोबत जिल्ह्याचा समृद्ध नैसर्गिक व सांस्कृतिक वारसा जपत स्थानिकांना जिल्ह्यातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर शासनाचा भर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!