Sunday, August 16, 2026
Homeगडचिरोलीआपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची मान्सूनपूर्व आढावा बैठक संपन्न..

आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची मान्सूनपूर्व आढावा बैठक संपन्न..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात मान्सून कालावधीत संभाव्य पूरस्थितीचा विचार करता प्रत्येक विभागाने आपापल्या जबाबदाऱ्यांनुसार आपत्ती निवारणासाठी ठोस पूर्वनियोजन करण्याच्या स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे,अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक एम.रमेश, उपवनसंरक्षक मिलीश शर्मा,सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीमती मानसी,कुशल जैन,नमन गोयल,रणजित यादव,अप्पर जिल्हाधिकारी नितीन गावंडे,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पंडा यांनी सांगितले की,जिल्ह्यातील पूरप्रवण ठिकाणांची यादी तयार करून त्या भागांमध्ये उपायोजना व दक्षता बाबत जनजागृती करावी. पूरस्थिती आणि इतर आपत्तीजनक प्रसंगांमध्ये विभागीय समन्वय अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रत्येक विभागाने आपापल्या कार्यक्षेत्रात जबाबदाऱ्या निश्चित करून त्वरित कृती करावी.गावपातळीवर स्थानिक तरुण,तैराक व स्वयंसेवकांची यादी तयार ठेवावी आणि आवश्यक धान्यसाठा ठेवावा.नदीनाल्यांवरील छोटे पूल व रस्ते दुरुस्त करून साफसफाई करावी. अतिक्रमणामुळे रस्ते बंद होणार नाहीत,याची खबरदारी घ्यावी.सर्पदंशासाठी तसेच इतर आजारांसाठी आवश्यक औषधांचा साठा सामुदायिक आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध करून ठेवावा. ग्रामपंचायतींनी विहीर,हँडपंप आणि पाणवठ्यांची स्वच्छता करून पिण्याच्या पाण्याजवळ सांडपाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी.नगरपालिकेने शहरांमध्ये लावलेली अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंग्ज तातडीने हटवावीत,असेही निर्देश त्यांनी दिले.
राष्ट्रीय महामार्ग,राज्यमार्ग आणि इतर शहरी व ग्रामीण रस्त्यांची कामे संबंधित यंत्रणेने पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत.ज्या ठिकाणी काम पूर्ण होणे शक्य नसेल, तिथे पर्यायी उपाययोजना कराव्यात.
नदीकिनाऱ्यावरील गावांना धोक्याचा इशारा वेळेवर देण्यात यावा.वाहतूक संपर्क तुटणाऱ्या गावांमध्ये अन्नधान्य,औषधसाठा वेळेवर पोहोचवावा आणि त्या गावांतील पुढील चार महिन्यांत प्रसूती अपेक्षित असलेल्या महिलांची यादी तयार करून त्यांना जवळच्या आरोग्य केंद्रात दाखल करण्याचे व त्यांच्या औषधोपचार व जेवणाची व्यवस्था करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी पंडा यांनी दिल्या.तसेच आरोग्य केंद्रांमध्ये मेंदूज्वर,मलेरिया,गॅस्ट्रो यांसारख्या आजारांसाठी आवश्यक औषधसाठा ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.मान्सून कालावधीत परवानगीशिवाय पाण्यात बोट,होडी,डोंगा घेऊन जाण्यास मनाई राहील.रस्त्यावरून व पुलावरून पूराचे पाणी वाहत असतांना वाहने चालवू नये,दूषित पाण्यामुळे होणारे आजार टाळण्यासाठी गावोगावी स्वच्छतेविषयी बैठका घ्याव्यात व जनजागृती करण्यचे त्यांनी सांगितले.या बैठकीस जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे यांनी पूरपरिस्थितीत उद्भवणारे संभाव्य धोके आणि विभागनिहाय राबवायच्या उपाययोजनांबाबत सादरीकरण केले.जलसंपदा विभागाचे उपअभियंता गणेश परदेशी यांनी विविध प्रकल्पांतील पाण्याची पातळी आणि विसर्गाबाबतची माहिती दिली.
बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, भूसंपादन अधिकारी प्रसेनजीत प्रधान,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किलनाके तसेच सर्व तहसीलदार,गटविकास अधिकारी,सिंचन विभाग,आरोग्य विभाग,पोलीस, विद्युत आणि इतर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केवळ इमारती,दुरुस्ती आणि भौतिक सुविधा निर्माण करणे अंतिम उद्दिष्ट नसून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे गरजेचे-शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर – ‘आदर्श’ व ‘पीएम श्री’...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र व राज्य शासनाकडून शाळांच्या पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधीचा वेळेत व उद्देशानुरूप विनियोग झाला...

आदर्श शाळांची संख्या वाढविण्यासोबतच विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यावर भर-राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-एकेकाळी मागास आणि नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून पाहिल्या जाणाऱ्या गडचिरोलीची ओळख आता वेगाने बदलत असून संपूर्ण देशाचे लक्ष या जिल्ह्याकडे वेधले जात...

तुकाराम मुंढेंचा बॉलिवूडच्या बड्या कलाकारांना दणका..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बॉलिवूड सिनेसृष्टीतील तीन बड्या कलाकारांना मोठा दणका दिला आहे.नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या पान...

पोलीस विभागात खळबळ; सहाय्यक पोलिस निरीक्षकाने संपवली जीवनयात्रा..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेल्या एका सहाय्यक पोलिस निरीक्षकाने(एपीआय) पीसीएमटीच्या शासकीय निवासस्थानी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!