- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-आपण अनेकदा चोर पोलीस खेळ खेळला असेल,काहींनी नसेलही खेळला.पण आम्ही लहानपणी ऐकले की,पोलीस हे चोरांना पकडत असतात.मात्र,एका प्रकरणात चक्क पोलिसांनीच पोलिसाला पकडण्याची वेळ आली म्हणावी लागेल. तशी घटनाही घडली आहे.मुंबईतील गोवंडी भागातील शिवाजीनगर पोलीस स्थानकामध्ये कार्यरत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव मधुकर देशमुख यांना मंगळवारच्या रात्री एसीबीच्या पथकाने एक लाख रुपयांची लाच स्वीकारतांना रंगेहाथ पकडले आहे.लाच लुचपत प्रतिबंधक विभागात पोलीस दलातीलच अधिकारी,कर्मचारी कार्यरत असल्याने चक्क पोलिसांनीच पकडले पोलिसाला असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.सदरच्या कारवाईने मुंबई पोलीस दलात एकच खळबळ माजली आहे.
तक्रारदार हे एका ट्रस्टचे संयुक्त सचिव असून एका कायदेशीर प्रकरणामध्ये मदत करण्याच्या मोबदल्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव देशमुख यांनी पाच लाख रुपयांची मागणी केली होती.सदर कामासाठी कमीत कमी तीन लाख रुपये द्यावेच लागतील,अशी मागणी करण्यात आली.कारवाई दरम्यान तडजोडीअंती अडीच लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली.त्यानुसार काल मंगळवारी सापडा रचण्यात आला.त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव देशमुख यांना एक लाखाची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले व बाबुराव देशमुख याचेवर लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे.
- Advertisement -

