Sunday, August 16, 2026
Homeगडचिरोलीअखेर आमदार रामदास मसराम यांच्या प्रयत्नांना यश.. आता घरकुल धारकांना पाच ब्रास...

अखेर आमदार रामदास मसराम यांच्या प्रयत्नांना यश.. आता घरकुल धारकांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार ऑफलाईन पद्धतीने..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-घरकुल धारकांसाठी आनंदाची बातमी असून उद्यापासून म्हणजेच गुरुवार १५ मे पासून गडचिरोली जिल्ह्यातील घरकुल बांधकाम करणाऱ्या लाभार्थींना पाच ब्रास मोफत वाळू पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने मिळणार आहे.याबाबत आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी वेळोवेळी प्रशासनास पत्रव्यवहार करून तसेच गडचिरोली जिल्हाधिकारी अवीश्यांत पंडा यांच्याशी संवाद साधून रेतीसाठी ऑनलाईन वाहतूक चालान बाबत उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात आणून दिल्या होत्या.घरकुल धारकांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागू नये; याकरीता आमदार रामदास मसराम यांच्या प्रयत्नांना यश आले असून आता
सर्वत्र उद्यापासून घरकुल लाभार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीने पाच ब्रास मोफत वाळू वाटप करण्यात येणार आहे.
शासनाच्या वतीने घरकुल योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना पाच ब्रास मोफत वाळू दिली जाते. त्यासाठी रेतीची वाहतूक करण्याकरीता वाहतूक चालान आवश्यक असते.यापूर्वी रेती वाहतुकीसाठी लाभार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच तहसील कार्यालयाकडून वाहतुकीची पावती देण्यात येत होती व लाभार्थी आपल्या सोयीनुसार वाळूची वाहतूक करीत होते.मात्र,काही कालावधी पूर्वी तहसील कार्यालयाकडून रेती वाहतुकीची पावती न देता वाळू डेपो प्रणालीच्या माध्यमातून ऑनलाईन नोंदणी करून पाच ब्रास मोफत वाळू मिळणार असल्याचे महसूल प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले होते.त्यानुसार घरकुल लाभार्थ्यांना वाळू डेपो प्रणालीत ऑनलाईन करण्यास तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत होते.अश्यातच आता काही कालावधीत पावसाळ्यास सुरुवात होणार असल्याने रेती अभावी घरकुल बांधकामे ठप्प पडण्याच्या स्थितीत येण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याने आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी सदरची बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिली.त्यामुळे शासन स्तरावरून दखल घेत अखेर आमदार मसराम यांच्या अथक परिश्रमाने घरकुल बांधकामधारकांचा पाच ब्रास मोफत वाळू मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अज्ञात तरुण आढळला गळफास घेतलेल्या अवस्थेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-चंद्रपूर मार्गावरील बॉटनिकल गार्डन समोरील चुनाभट्टी जवळच्या जंगल परिसरात एक तरुण गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली....

केवळ इमारती,दुरुस्ती आणि भौतिक सुविधा निर्माण करणे अंतिम उद्दिष्ट नसून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे गरजेचे-शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर – ‘आदर्श’ व ‘पीएम श्री’...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र व राज्य शासनाकडून शाळांच्या पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधीचा वेळेत व उद्देशानुरूप विनियोग झाला...

आदर्श शाळांची संख्या वाढविण्यासोबतच विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यावर भर-राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-एकेकाळी मागास आणि नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून पाहिल्या जाणाऱ्या गडचिरोलीची ओळख आता वेगाने बदलत असून संपूर्ण देशाचे लक्ष या जिल्ह्याकडे वेधले जात...

तुकाराम मुंढेंचा बॉलिवूडच्या बड्या कलाकारांना दणका..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बॉलिवूड सिनेसृष्टीतील तीन बड्या कलाकारांना मोठा दणका दिला आहे.नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या पान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!