Wednesday, August 19, 2026
Homeनागपूरसर्वसामान्यांना दिलासा; सोन्याच्या भावात तब्बल २,८०० रुपयांची घसरण..

सर्वसामान्यांना दिलासा; सोन्याच्या भावात तब्बल २,८०० रुपयांची घसरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव दिवसागणिक वाढत होते.सोने ३ टक्के जीएसटीसह लाख रुपयांवर पोहोचले होते.त्यामुळे सोन्याची खरेदी सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली.मात्र,आता २४ कॅरेट सोन्याचे भाव तब्बल २,८०० रुपयांनी घसरल्याने
लोकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.अश्यातच सोन्याचा भाव आणखी कमी होण्याची शक्यता सराफांनी व्यक्त केली.नागपुरात काल सोमवारी सोन्याचे भाव घसरले.अमेरिका-चीनमधील व्यापार युद्धातील तणाव कमी झाला आणि देशातील शेअर मार्केटच्या तेजीला मदत मिळाली.परिणामी सोन्याचे भाव घसरले. शनिवारच्या ९६,८०० रुपयांच्या तुलनेत सोमवारी भाव ९४,००० रुपयांपर्यंत उतरले.
काल सोमवारी पाच सत्रात सोन्याचे भाव कमी झाले, तर अखेरच्या सत्रात २०० रुपयांनी वाढले. तुलनात्मकरित्या शनिवारच्या ९६,८०० रुपयांच्या तुलनेत काल सोमवारी सकाळच्या सत्रात भाव तब्बल २,१०० रुपयांनी उतरले.त्यानंतर भावात पुन्हा घसरण झाली.सायंकाळी बंद सत्रात २४ कॅरेट सोन्याचे भाव ९४,००० रुपये,२२ कॅरेटचे भाव ८७,४०० रुपयांपर्यंत घसरले.दुसरीकडे किलो चांदीच्या भावात ५००  रुपयांची घसरण होऊ भावपातळी शनिवारच्या ९६,९०० रुपयांच्या तुलनेत ९६,३०० रुपयांवर स्थिरावली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित.. आता सर्पदंशाची प्रत्येक घटना,विषप्रतिबंधक लसीचा साठा,केलेले उपचार व मृत्यूची नोंद करणे बंधनकारक..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील सर्पदंशाच्या घटनांमुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्व रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले असून सर्पदंशाला ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित करण्यात...

अज्ञात चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक; पतीचा मृत्यू,पत्नी गंभीर जखमी.. – देसाईगंज-आरमोरी मार्गावरील घटना..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज-आरमोरी मार्गावर जणूकाही अपघातांच्या मालिकांचे सत्र सुरू झाले की काय?अशी स्थिती निर्माण झाली आहे.नुकताच गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ रोजी देसाईगंज-आरमोरी मार्गावरील कुरुड...

अल्पवयीन मुलाने शाळकरी मुलाची केली हत्या..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-भंडारा शहरातून आज,मंगळवार १८ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून एका शाळकरी मुलाच्या हत्येने संपूर्ण शहर हादरून...

सर्पदंश घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या वारसांना आणखी प्रत्येकी ५ लाखांचे अर्थसहाय्य मंजूर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या तीन विद्यार्थिनींच्या कायदेशीर वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी ५...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!