Friday, September 4, 2026
Homeगडचिरोलीगायी,म्हशी,कुक्कुट पालन पिलांचा लाभ हवाय; तर करा ऑनलाईन अर्ज..

गायी,म्हशी,कुक्कुट पालन पिलांचा लाभ हवाय; तर करा ऑनलाईन अर्ज..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षीत व बेरोजगार युवकासह पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन देत त्यांना शाश्वत अर्थाजनाचा पर्याय उपलब्ध करुन देणाऱ्या पशुसंवर्धन विभागाने विविध योजना व उपक्रमाव्दारे ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थचक्र गतिमान ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे.विविध योजना व उपक्रमांच्या माध्यमातुन ग्रामीण भागातील पशुपालक/शेतकरी बांधवांना स्वंयरोजगाराचे साधन उपलब्ध करुन देण्यासाठी कटिबध्द असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वैयक्तीक लाभाच्या योजना अंतर्गत प्रक्रिया अधिक पारदर्शक करणेसाठी राज्यस्तरीय नाविण्यपुर्ण योजनेमध्ये गेली चार वर्ष ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविणे व लाभार्थी निवड करण्याची पध्दत सुरु करण्यात आली आहे.आता याबरोबर जिल्हास्तरीय विविध योजनांसाठी संगणक प्रणाली लागु करण्यात आली आहे.यामध्ये शासनाने एखाद्या योजनेकरीता अर्ज केल्यानंतर त्यास दरवर्षी पुन्हा अर्ज करावे लागु नये यासाठी तयार केलेली प्रतिक्षायादी सन २०२१-२२ पासुन पुढील ५ वर्षापर्यंत म्हणजे सन २०२५-२६ पर्यंत लागु ठेवण्याची सोय केली आहे. यामुळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली असुन,त्याची प्रतिक्षा यादीतील क्रमांकानुसार केव्हा लाभ मिळेल हे कळु शकल्यामुळे लाभार्थी हिस्सा भरणे किंवा इतर बाबींकरीता नियोजन करता येणे शक्य होणार आहे.त्यानुसार नाविण्यपुर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत दुधाळ गाई/ म्हशीचे गट वाटप करणे, शेळी/मेंढी गट वाटप करणे,१००० मांसल कुक्कूट पक्षांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे,१०० कुक्कूट पिलांचे वाटप व २५+३ तलंगा गट वाटप या योजनेसाठी ऑनलाईन पध्दतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन २०२५-२६ या वर्षात राबविली जाणार आहे.पशुपालकांना डेअरी,पोल्ट्री किंवा शेळीपालन यापैकी ज्या बाबींमध्ये अर्ज करावयाचा आहे,त्याची निवड करण्याची सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे.राज्यातील पशुपालक/शेतकरी बांधव,सुशिक्षीत बेरोजगार युवक /युवती व महिलांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात येत आहे.
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ :-https.//ah.mahabms.com
अँड्राईड मोबाईल ॲप्लिकेशनचे नांव:- AH-MAHABMS(Google Play स्टोरवरील मोबाईल ॲपवर उपलब्ध)
अर्ज करण्याचा कालावधी:- २/०५/२०२५ ते ०१/०६/२०२५
टोल फ्री क्रमांक:-१९६२ (वेळ- सोमवार ते शनीवार सकाळी ७ ते सांयकाळी ६ वाजे पर्यंत)
अधीक माहितीसाठी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखाना,पशुसंवर्धन विभाग (पंचायत समिती,जिल्हा परिषद),जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयात संपर्क साधावा.
योजनांची संपुर्ण माहिती तसेच अर्ज करण्याची पध्दती याबाबतचा संपुर्ण तपशील संकेतस्थळावर तसेच मोबाईल ॲपवर उपलब्ध आहे.अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीनेच स्विकारले जातील.या संगणक प्रणालीमध्ये अर्ज भरणे अत्यंत सुलभ करण्यात आले असुन,अर्जामधील माहिती कमीत कमी टाईप करावी लागेल आणी बहुतांशी माहितीबाबत पर्याय निवडण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.त्यामुळे पशुपालकांनी अर्ज भरण्याकरीता स्वत:चे मोबाईलचा जास्तीत जास्त वापर करावा.अर्ज भरतांना अर्जदाराने नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थीतीबाबत संदेश पाठविण्यात येणार असल्याने कोणत्याही परिस्थीतीत अर्जदाराने योजनेअंतर्गत आपला मोबाईल क्रमांक बदलु नये व मागिल वर्षी अर्ज केलेल्या अर्जदारांनी पुन्हा अर्ज करावयाची आवश्यकता नाही.योजनेबाबत अधिक माहितीसाठी वरील टोल फ्री क्रमांकावर किंवा तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा उपआयुक्त कार्यालय,तालुका लघुपशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा,असे आवाहन डॉ.विलास गाडगे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त गडचिरोली यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

मोहफुलाची दारू नाही; तर पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहफुलांचा अवैध मद्यनिर्मितीसाठी होणारा वापर रोखून त्यापासून पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करण्याची सक्षम मूल्यसाखळी जिल्ह्यात उभारावी.महिला बचत गटांना...

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!