Friday, June 19, 2026
Homeगडचिरोलीगोसेवा आयोगाकडे गोशाळाची नोंदणी करा; अन्यथा मान्यता होणार रद्द..

गोसेवा आयोगाकडे गोशाळाची नोंदणी करा; अन्यथा मान्यता होणार रद्द..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-महाराष्ट्र राज्यात पशुंचे संवर्धन,संरक्षण व कल्याण करण्यासाठी कार्यरत संस्थाचे पर्यवेक्षण या दृष्टीने महाराष्ट्र गोसेवा आयोग अधीनीयम २०२३ दिनांक- २८ एप्रिल २०२३ च्या शासन राजपत्रात प्रसिध्द अधीसुचनेनुसार स्थापन झाला आहे.महाराष्ट्र गोसेवा आयोग अधीनीयम २३ मधील  प्रकरण ३ नियम क्रं.१२ अन्वये आयोगाच्या स्थापनेनंतर राज्यातील गोशाळांची नोंदणी आयोगाकडे करणे बंधनकारक आहे.महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे गोशाळा नोंदणीची कार्यवाही ही बऱ्याच दिवसांपासुन सुरु आहे.जिल्हयातील गोशाळा नोंदणीचे शंभर टक्के काम हे ३० मे २०२५ अखेर पुर्ण कराव्या,अशा सुचना गोसेवा आयोगाकडुन निर्गमीत करण्यात आलेल्या आहेत.महाराष्ट्र गोसेवा आयोग अधीनीयम २३/२०२३ मधील प्रकरण तीन संस्थाची नोंदणी कलम १२ अन्वये या नियमाच्या प्रारभांच्या दिनांकास अस्तीत्वात असलेल्या संस्थांनी सहा महिन्याच्या आत आयोगाकडे नोंदणी करणे गरजेचे आहे व नवीन स्थापन झालेल्या संस्थानी तीन महिन्याच्या आत आयोगाकडे नोंदणी करावयाची आहे.तथापी ३० मे २०२५ नंतर पुर्वीपासुन अस्तीत्वात असलेल्या अनोंदणीकृत गोशाळा कायद्यान्वे ग्राहय धरण्यात येणार नाही व संबधीत गोशाळोची मान्यत रदद करण्यात येवुन गोशाळेतील पशुधन इतर नोंदणीकृत गोशाळेत हलविण्यात येईल व गोशाळेवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.असे आयोगाकडुन कळविण्यात आलेले आहे.तरी जिल्ह्यातील कार्यरत सर्व गोशाळा यांनी वर दिलेल्या तारखेच्या आत नोंदणी करावी,असे आवाहन डॉ.विलास अ.गाडगे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त गडचिरोली यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

स्थानिक उत्पादनांना मिळणार नवी ओळख; गडचिरोली ब्रँडसाठी स्वतंत्र लोगो आणि टॅगलाईन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र 'गडचिरोली ब्रँड' विकसित करणे,पर्यटन विकासाला गती देणे,महिला बचत गटांना अधिक सक्षम बनविणे,धान साठवणुकीची क्षमता...

गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – गडचिरोली हे भविष्यात देशातील महत्त्वाचे औद्योगिक व पोलाद उत्पादन केंद्र म्हणून...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्राला देशातील ‘ग्रीन स्टील हब’ बनविण्याच्या उद्देशाने केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्रालयाने गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात,अशी...

माजी सैनिकास पैश्याची मागणी; महिला लिपिक एसीबीच्या कचाट्यात..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-एका ३६ वर्षीय महिला लिपिकेस(महसुल सहाय्यक)माजी सैनिक यांचे ताब्यात असलेली सिलींगची अतिक्रमीत जमीन माजी सैनिक म्हणुन त्यांचे नावावर नियमीत करुन देण्याच्या...

बळीराजासमोर यंदा महागाईचे नवे आव्हान; खत, बियाणे महागले..

उद्रेक न्युज वृत्त :-शेतकरी बांधवांची जिकडून-तिकडून पिळवणूक सुरू आहे.पावसाळ्याचे महिने सुरू होऊनही कित्येक दिवसांपासून पाऊस पडण्याचे नावाच घेत नाहीये.अश्यातच आभाळाकडे आशेने नजरा लावून बसलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!