Friday, September 4, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तपीएम किसानचा हप्ता बंद झालाय; टेन्शन घेऊ नका.. - आता प्रत्येक जिल्ह्यात...

पीएम किसानचा हप्ता बंद झालाय; टेन्शन घेऊ नका.. – आता प्रत्येक जिल्ह्यात एक विशेष नोडल अधिकारी नियुक्त..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :- ‘पंतप्रधान किसान सन्मान योजना’ ही केंद्र सरकारची महत्वकांक्षी योजना आहे.
लहान शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.या योजनेअंतर्गत,पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये दिले जातात.सरकार दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांना २ हजार रुपयांची आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.सदरची योजना ही १ डिसेंबर २०१८ रोजी सुरू करण्यात आली.याचा लाभ २ हेक्टरपर्यंत शेत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना मिळत असून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास थोडीफार मदत होत असते.त्यातच आता शासनाने योजनेत काही बदल करीत सदरच्या बदलांमुळे शेतकऱ्यांची मोठी सोय होईल.यानंतर, ज्या शेतकऱ्यांना कोणत्याही कारणास्तव हप्ता मिळत नाही,त्यांना आता काळजी करण्याची गरज नाही. शासनाने प्रत्येक जिल्ह्यात एक विशेष नोडल अधिकारी नियुक्त केला आहे.या संदर्भात त्यांच्या मोबाईल नंबरवर किंवा ई-मेलवर तक्रार करू शकता.  घरी बसून आरामात नोडल अधिकाऱ्यांचे नंबर आणि ई-मेलची माहिती ऑनलाइन मिळवू शकता.
प्रक्रिया👇
सर्वप्रथम तुम्ही पीएम किसान वेबसाइट https://pmkisan.gov.in वर जा.
> यानंतर,फार्मर कॉर्नरमधील सर्च युवर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट (POC) वर क्लिक करा.
> येथे,राज्य निवडल्यानंतर,तुम्हाला त्यांच्या नोडल अधिकाऱ्यांशी संबंधित माहिती मिळेल.
> जिल्ह्याच्या नोडल अधिकाऱ्यांबद्दल माहितीसाठी, तुम्ही सर्च डिस्ट्रिक्ट नोडल तपासू शकता.
> येथे तुम्ही तुमचे राज्य आणि जिल्हा निवडा आणि सर्च बटण दाबा.
> जर तुम्हाला महाराष्ट्रातल्या नोडल अधिकाऱ्यांची यादी हवी असेल तर महाराष्ट्र निवडा आणि जर तुम्हाला ज्या जिल्ह्याच्या नोडल अधिकाऱ्यांची यादी हवी असेल तर त्या जिल्ह्यावर क्लिक करा.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

मोहफुलाची दारू नाही; तर पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहफुलांचा अवैध मद्यनिर्मितीसाठी होणारा वापर रोखून त्यापासून पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करण्याची सक्षम मूल्यसाखळी जिल्ह्यात उभारावी.महिला बचत गटांना...

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!