Tuesday, April 28, 2026
Homeदेसाईगंजपाऊस पडते तासभर अन् लाईट जाते रातभर..! - महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार...

पाऊस पडते तासभर अन् लाईट जाते रातभर..! – महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर.. – कर्तव्यात हयगय करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा- कांग्रेस नेते लिलाधर भर्रे

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यातील अनेक गावांत मागील काही महिन्यांपासून महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे पाऊस पडते तासभर आणि लाईट जाते रातभर,अशी स्थिती नियमित असतांना याकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात येत असल्याने कर्तव्यात हयगय करणाऱ्या संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी कांग्रेसचे नेते लिलाधर भर्रे यांनी केली आहे.
भर्रे यांनी म्हटले की,मागील काही महिन्यांपासून अधुन-मधुन पाऊस होत असल्याने वारंवार लाईट जाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.दरम्यान अलिकडे गोरगरिबांना केरोसिनही मिळणे दुरापास्त झाल्याने घरात दिवा जाळणेही कठीण झाले असतांना संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागत आहे.विशेषतः होत असलेल्या पावसामुळे अनेकदा साप,विंचु तसेच विषारी किड्यांच्या दंशाने अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.तसेच हलकासा पाऊस जरी पडला तरीही ग्रामीण भागासह शहरी भागात  वारंवार खंडित होणाऱ्या विज पुरवठ्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने एकुणच महावितरणचा भोंगळ कारभार पुरता चव्हाट्यावर येऊ लागला आहे.दरम्यान,याबाबत देसाईगंज येथील महावितरण कंपनीच्या शाखा अभियंता तसेच लाईमन यांना विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने याबाबत कुणाकडे दाद मागावी?असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.वारंवार खंडित होत असलेल्या विज पुरवठ्यामुळे संपूर्ण गाव अंधकारमय होऊन कोणत्याही क्षणी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही,करिता वरिष्ठांनी या गंभीर समस्येकडे जातीने लक्ष देऊन स्थानिक शाखा अभियंते व संबंधित कर्मचारी यांच्या बेलगाम वृत्तीला आळा घालण्यासाठी तात्काळ ठोस पावले उचलत कर्तव्यात हयगय करणाऱ्या संबंधीतावर कायदेशीर कारवाई करून वारंवार विज पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी; अन्यथा कांग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे भर्रे यांनी स्पष्ट केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

इयत्ता दहावी व बारावी परीक्षेचा निकाल लवकरच..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने गत फेब्रुवारी व मार्च महिन्यात दहावी व बारावीची परीक्षा घेतली होती.त्यात ३७ हजार...

घर बांधणे झाले महाग; लोहा,सिमेंट,विटा अन् रेतीचे भाव कडाडले..

उद्रेक न्युज वृत्त :-बांधकाम साहित्यांच्या वाढत्या किमतींमुळे लोकांच्या बजेटवर मोठा ताण आल्याचे चित्र आहे.यामुळे सर्वसामान्यांना घर बांधणे कठीण झाले आहे.लोहा,सिमेंट,विटा अन् रेतीचे भाव कडाळल्याने...

खेळता-खेळता सांडपाण्याच्या खड्यात पडल्याने चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-खेळत असतांनाच घरालगत असलेल्या सांडपाण्याच्या खड्यात पडून ३ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्याच्या काटोल तालुक्यातील कोंढाळी येथील शिक्षक...

कारखान्यात आढळून आले बालकामगार; संचालकासह चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखादी कंपनी असो वा कुठलेही दुकान, हॉटेल,ढाबे,चहाची दुकाने वा इतर आस्थापनांमध्ये बालकांना कामावर ठेवणे गंभीर गुन्हा आहे.यात १४ वर्षे वयाखालील मुलांचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!