Friday, September 11, 2026
Homeगडचिरोलीकोरेगावची सपना लाडे तर भेंडाळा येथील राहुल वैरागडेची जिल्हा युवा पुरस्कारासाठी निवड..

कोरेगावची सपना लाडे तर भेंडाळा येथील राहुल वैरागडेची जिल्हा युवा पुरस्कारासाठी निवड..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा धोरण २०१२ अंतर्गत व राज्य युवा धोरण २०१२ अन्वये जिल्ह्यातील युवक व युवतींच्या समाजहिताच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी दरवर्षी जिल्हास्तरावर “जिल्हा युवा पुरस्कार” प्रदान करण्यात येतो.जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,गडचिरोली यांच्यातर्फे सन २०२३-२४ या वर्षासाठी पुरस्कारार्थींची घोषणा करण्यात आली आहे.त्यानुसार युवक विभागात राहुल संजय वैरागडे रा.भेंडाळा, ता.चामोर्शी तर युवती विभागात कु.सपना सुधाकर लाडे रा.कोरेगाव,ता.देसाईगंज यांची निवड करण्यात आली आहे.दोन्ही पुरस्कारार्थींना प्रत्येकी १० हजार रुपये,स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.सदरचा पुरस्कार गुरुवार १ मे २०२५ रोजी महाराष्ट्र दिनाच्या समारंभात पोलीस मुख्यालय परेड मैदान गडचिरोली येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे.
 
राहुल वैरागडे यांनी केलेली कार्य👇
 
पाणपोई उभारणे,सामान्य ज्ञान स्पर्धांचे आयोजन,गुणवंत विद्यार्थी सत्कार, वनराई बंधारा बांधणे,पक्षी संवर्धन, वृक्षारोपण,वनसंवर्धन, कोरोनावरील जनजागृती पथनाट्य सादरीकरण,क्रीडा स्पर्धा आयोजन,मतदार जनजागृती,रक्तदान शिबीर,पूरग्रस्त मदतकार्य,स्वच्छता मोहीम व अंधश्रद्धा निर्मूलन अशा विविध सामाजिक उपक्रमांत सक्रीय सहभाग घेतला आहे.
कु.सपना लाडे यांनी केलेली कार्य👇
 
आरोग्य शिबिरे, “केच द रेन” अभियान,स्वयंसेवक नोंदणी,अ‍ॅनिमिया तपासणी कॅम्प, “माझी माती माझा देश”, “हर घर तिरंगा”, जल जीवन मिशन,पक्षी संवर्धन,वृक्षारोपण, कोविड-१९ लस शिबिरे,तालुका क्रीडा स्पर्धा,मतदार जनजागृती,व्यसनमुक्ती,स्वच्छता व अंधश्रद्धा निर्मूलन,पोषक आहार प्रचार असे विविध उपक्रम राबवले आहेत.
या दोन्ही युवक-युवतींच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना सन २०२३-२४ चा जिल्हा युवा पुरस्कार प्रदान केला जाणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांनी दिली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

बापरे..! तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून फिल्मी स्टाईलने पळवली रोकड.. – बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात फेकली मिरची पूड; व्हिडिओ व्हायरल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २८ वर्षीय तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत प्रवेश करून आव-डाव पाहिला अन् बँकेतील उपस्थित कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड...

विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी मागितले दोन हजार; लीपिकास ऑफिसमध्येच पकडले एसीबीने..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी आरोग्य खात्यातील लीपिकाने शासकीय फी व्यतिरिक्त अतिरिक्त लाचेच्या रकमेची मागणी केल्याप्रकरणी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या(ACB) पथकाने सापळा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!