Friday, September 11, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तवहिनीला टोमणे मारणे म्हणजे क्रूरता नाही- उच्च न्यायालय

वहिनीला टोमणे मारणे म्हणजे क्रूरता नाही- उच्च न्यायालय

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-ग्रामीण तसेच शहरी भागात काही महिला वा पुरुष वर्गांकडून कुठला तरी आधार घेऊन टोमणे मारण्याचा म्हणजेच टोचून बोलणे किंवा एखादा आधार घेऊन तिरकस बोलण्याचा प्रयत्न केला जातो.त्यातच घरातील एखाद्या स्त्रीला मुल बाळ होत नसेल तर टोमणे मारणे वेगळेच असते.असाच प्रकार एका कुटुंबात घडल्याने महिलेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.मात्र,सदर महिलेस आई होऊ न शकल्याबद्दल पतीच्या बहिणींनी त्यांच्या वहिनीला टोमणे मारणे म्हणजे क्रूरता नाही,असे आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने म्हटले आहे.भारतीय दंड संहितेच्या कलम ४९८-अ किंवा हुंडा प्रतिबंधक कायदा,१९६१ च्या कलम ३ आणि ४ अंतर्गत खटला चालू ठेवण्यासाठी हे पुरेसे कारण मानले जाऊ शकत नाही.महिलेची याचिका फेटाळतांना न्यायमूर्ती हरिनाथ एन म्हणाले की,आरोपी याचिकाकर्त्याच्या घरापासून दूर राहत होता.त्यामुळे मुल-बाळ होत नसल्याने टोमणा मारणे हे क्रूरता कसे ठरू शकते? त्यानुसार उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माता व नवजात बालिकेचे प्राण वाचविण्यात वैद्यकीय पथकाला यश.. – मातामृत्यू कमी करण्यासाठी वेळेवर नोंदणी व उपचार घेण्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथील कालीअम्मल हॉस्पिटल येथे अतिजोखमीच्या गर्भधारणेतील अत्यंत गंभीर व गुंतागुंतीच्या प्रकरणात वेळेवर निदान,रक्तघटकांचा पुरवठा,आवश्यक उपचार व तातडीची...

धरणात बुडालेल्या तरुण शेतकऱ्याचा सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बैल पोळा सणाच्या एक दिवसापूर्वी धरण परिसरात बैल धुण्यासाठी गेलेला तरुण शेतकरी बुडाल्याची घटना काल,बुधवार ९ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या...

सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन,वारसा हक्क,पदोन्नती व निवासाच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करा- राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांचे आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता राखण्यात सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.त्यामुळे त्यांच्या वेतन,सेवा,आरोग्य, निवास व आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा...

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये उत्तम मूल्यसंस्कार रुजविणे काळाची गरज-शिक्षणमंत्री दादाजी भुसे – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत आज विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी.. – पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच भावी पिढीवर राष्ट्रभक्तीचे आणि उत्तम मूल्यांचे संस्कार रुजवणे गरजेचे आहे.गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!