Saturday, September 5, 2026
Homeगडचिरोलीअखेर महिलेची हत्या करणाऱ्या आरोपीस गडचिरोली पोलिसांनी ठोकल्या बेड्या; हत्यारा पाच दिवसांनी...

अखेर महिलेची हत्या करणाऱ्या आरोपीस गडचिरोली पोलिसांनी ठोकल्या बेड्या; हत्यारा पाच दिवसांनी गवसला..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-गडचिरोली जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातून कनिष्ठ प्रशासन अधिकारी पदावरून सहा वर्षापूर्वी निवृत्त झालेल्या महिला अधिकारी कल्पना केशव उंदीरवाडे वय ६४ वर्षे,रा.नवेगाव,गडचिरोली यांच्या हत्येचे गूढ पाच दिवस उलटूनही कायम होते. पोलिस उपनिरीक्षक असलेल्या त्यांच्या भावाच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीवर १४ एप्रिल रोजी गुन्हा नोंद झाला; पण,हत्या कोणी व कशासाठी केली? हे प्रश्न अनुत्तरित असतांनाच अखेर महिलेची हत्या करणाऱ्या आरोपीस गडचिरोली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.विशाल ईश्वर वाळके वय ४० वर्षे, रा.ता.चामोर्शी जि.गडचिरोली असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.सदर आरोपी हा कल्पना उंदीरवाडे यांच्या घरी भाड्याने(किरायाने) राहत होता.
याबाबत अधिक माहिती अशी की,गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या ५ किलोमिटर अंतरावर असलेल्या नवेगाव येथे रविवार १३ एप्रिल २०२५ रोजी गडचिरोली जिल्हा परिषदेतील सेवानिवृत्त महिला अधिकारी कल्पना उंदिरवाडे यांची डोक्यावर लोखंडी रॉडने प्रहार करून हत्या केल्याची घटना दुपारच्या सुमारास उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.कल्पना उंदिरवाडे या आपल्या मुलासोबत नवेगाव येथील सुयोगनगर येथे राहत होत्या.त्यांच्यासोबत घरकाम करणाऱ्या शांताबाई अंबादास मुळे वय ६०,रा.नवेगाव यासुद्धा राहत होत्या.उंदिरवाडे यांचे राहते घर दुमजली असून, खाली व वरच्या मजल्यावर तीन कौटुंबिक खोल्या आहेत.सर्वात वरच्या मजल्यावर तीन सिंगल रूम असून,त्याठिकाणी शिक्षण घेणाऱ्या मुली राहत आहेत.सर्वच खोल्या किरायाने दिल्या आहेत.अशातच तीन कौटुंबिक खोल्यांपैकी एका खोलीत आरोपी विशाल ईश्वर वाळके,त्याची पत्नी व आई किरायाने होते.अशातच विशाल वाळके याच्यावर कर्ज व हात उसनवारी घेतलेले इतरांचे पैसे देणे होते.त्यामुळे त्याने १३ एप्रिल रोजी कल्पना उंदीरवाडे यांच्या घरी चोरी करण्याचा प्रयत्न केला.चोरी करतांना आरोपी सापडला असता,त्याने कल्पना यांचे डोक्यावर रॉडने प्रहार केला.त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला.कल्पना उंदीरवाडे यांचा मृत्यू होताच आरोपी विशाल वाळके याने कल्पना यांच्या अंगावरील तीन दागिने घेऊन पसार झाला होता.यांनतर पोलीस तपास पथकांनी साक्षीदार तसेच इतर पुराव्यांच्या मदतीने संशयीतांची यादी तयार केली.त्यात आरोपी विशाल वाळके हिट लिस्टवर होता.लागलीच संशयाची सुई बळावली अन् तो अलगद जाळ्यात अडकला.पोलिसी खाक्या मिळताच आरोपी विशाल वाळके फाडफाड बोलू लागला व हत्येची कबुली दिली.विशाल ईश्वर वाळके यास सदर गुन्हामध्ये आज,शुक्रवार १८ एप्रिलला अटक करून न्यायालयात हजर केले असता,न्यायलयाने आरोपीस ४ दिवसांची म्हणजेच १८ एप्रिल ते २२ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सतर्कता बाळगा..! नुकसानभरपाईच्या बहाण्याने शेतकऱ्यांकडून घेतले आधार कार्ड,पॅन कार्ड आणि सातबारे उतारे.. – अन् उचलले ७३ कोटींहून अधिकचे कर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-भोळ्या-भाबड्या,गरीब आणि अल्पशिक्षित शेतकऱ्यांना सरकारी योजनेअंतर्गत दरवर्षी दहा हजारांची नुकसाभरपाईची मदत मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची कागदपत्रे मिळवली आणि त्यांच्याच नावावर...

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!