Sunday, May 24, 2026
Homeनागपूर'त्या' पाचही आरोपींना आज न्यायालयात करणार हजर.. - शिक्षक,शिक्षकेत्तर घोटाळा प्रकरण..

‘त्या’ पाचही आरोपींना आज न्यायालयात करणार हजर.. – शिक्षक,शिक्षकेत्तर घोटाळा प्रकरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-शिक्षक म्हणून कुठलाही अनुभव नसतांना पराग पुडके नावाच्या व्यक्तीची थेट मुख्याध्यापकपदाची शालार्थ आयडी तयार करण्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पाचही आरोपींना न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी वाढवून दिली आहे.त्यानुसार आरोपी पोलिस कोठडीत राहणार असून आज,मंगळवारी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
शिक्षक घोटाळ्यातील शिक्षण विभागाचे उपसंचालक उल्हास नरड यांनी देवताळा,ता.लाखनी,जि.भंडारा येथील मुख्याध्यापक पराग पुडके यांना कुठलाही अनुभव नसताना त्यांची मुख्याध्यापक पदाची शालार्थ आयडी तयार करून मुख्याध्यापक बनविल्यामुळे शुक्रवारी रात्री उल्हास नरड व पराग पुडके यांना अटक करण्यात आली होती.त्यानंतर रविवारी शिक्षणाधिकारी कार्यालयातील अधीक्षक वर्ग दोन नीलेश शंकरराव मेश्राम,शिक्षण उपसंचालक कार्यालयातील उपनिरीक्षक संजय शंकरराव दुधाळकर वय ५३ वर्षे व शिक्षण उपसंचालक कार्यालयातीलच वरिष्ठ लिपीक सूरज पुंजाराम नाईक वय ४० वर्षे अटक केली आहे.अटक करण्यात आलेल्या पीसीआर आरोपींचा काल सोमवारी संपल्यामुळे त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपींच्या पोलिस कोठडीत एक दिवसाची वाढ केली होती.त्यानुसार हे आरोपी मंगळवारपर्यंत पोलिस कोठडीत राहणार असून आज  मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर करून पुन्हा पोलिस कोठडीची मागणी करण्यात येणार असल्याचे नागपूर सदर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

रोजगार हमी योजनेच्या कायद्याची जागा घेणाऱ्या ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेत १२५ दिवस काम देण्याची हमी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-२००५ कायद्याची जागा आता 'विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजिविका...

सामान्य माणसाचा जीव २५ लाखांचा ठरवत असाल तर तुम्ही स्वतः वाघासमोर उभे राहा; आम्हीही तुम्हाला २५ लाख देतो..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरात वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाला.या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.या पार्श्वभूमीवर सामाजिक...

वाढदिवसाचा कार्यक्रम असल्याचा बनाव; बालविवाहात सरकारी पाहुण्यांची एंट्री..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह २० वर्षीय तरुणासोबत लावल्या जात असल्याची माहिती नागपूर जिल्हा बालसंरक्षण कक्षाला प्राप्त होताच पथकाने अल्पवयीन मुलीची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!