Friday, September 4, 2026
Homeगडचिरोलीतब्बल चार वर्षानंतर मिळाले ४५० आंतरजातीय विवाह जोडप्यांना ५० हजाराचे अर्थसहाय्य...

तब्बल चार वर्षानंतर मिळाले ४५० आंतरजातीय विवाह जोडप्यांना ५० हजाराचे अर्थसहाय्य…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-समाजातील जातिभेद व अस्पृश्यता निर्मूलनासाठी राज्य शासनाच्या समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजने अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील ४५० आंतरजातीय विवाहीत जोडप्यांना तब्बल चार वर्षानंतर प्रत्येकी ५० हजार याप्रमाणे एकूण २ कोटी २५ हजारांचे अर्थसहाय्य वितरित करण्यात आले आहे.सदर योजनेचे उद्दिष्ट समाजात समता,बंधुता आणि सामाजिक सलोखा निर्माण करणे असून आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना आर्थिक मदतीच्या स्वरूपात प्रोत्साहन देण्यात येते. योजनेअंतर्गत केंद्र व राज्य शासनाचा समान ५०-५० टक्के हिस्सा असतो.
वित्तीय वर्ष २०२४-२५ मध्ये गडचिरोली जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाला शासनाकडून एकूण २ कोटी २५ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता.या निधीमधून ४५० पात्र लाभार्थी जोडप्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट प्रणालीद्वारे ३१ मार्च २०२५ पर्यंत हे अर्थसहाय्य जमा करण्यात आले.
विशेष म्हणजे,सन २०२१-२२ पासून प्रलंबित असलेल्या सर्व पात्र लाभार्थींनाही योजनेचा लाभ यंदा वितरित करण्यात आला आहे.याबाबत माहिती देताना जिल्हा परिषद गडचिरोलीचे समाजकल्याण अधिकारी चेतन हिवंज यांनी सांगितले की,शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे समाजातील जातीभेद दूर होण्यास हातभार लागेल,तसेच आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांचे मनोबल वाढेल.भविष्यात अधिकाधिक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा,असे आवाहनही त्यांनी केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!