Thursday, October 15, 2026
Homeनागपूरएकाच क्रमांकाच्या दोन वाहनांनी उडाली तारांबळ - नियम मोडला भलत्यानेच; चालान आला...

एकाच क्रमांकाच्या दोन वाहनांनी उडाली तारांबळ – नियम मोडला भलत्यानेच; चालान आला दुसऱ्यालाच

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

नागपूर :- एकाच क्रमांकाच्या अनेक गाड्या शहरात फिरत असल्याची बाब उघडकीस आली आहे.एका व्यक्तीने नियम मोडल्यानंतर दुसऱ्याच व्यक्तीला दंड भरण्यासाठी ई-चालान आल्याने ही बाब उघड झाली आहे.चालान मिळालेले अनिल पवार यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार करून त्यांच्या वाहनाच्या क्रमांकाचा वापर करून गुन्हे करण्यात वापर होण्याची व फसले जाण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

हुडकेश्वर येथील ढग्याच्या बंगल्याजवळ राहणारे अनिल पवार यांच्या मोबाईलवर आलेले पोलिसांचे चालान पाहून धक्काच बसला.१४ फेब्रुवारीला कॉटन मार्केटमध्ये एमएच-४९,बीएफ ४६०९ क्रमाकांच्या वाहनचालकाने कुठला तरी नियम मोडल्याने ७५९ रुपये दंड भरण्यासाठीचा संदेश चालानासह त्यांच्या मोबाईलवर त्याच दिवशी प्राप्त झाला.

सोबत संबंधित वाहनाचा फोटोसुद्धा होता.गाडीचा क्रमांक पाहून तेही चक्रावले.त्या दिवशी ते कॉटन मार्केटला गेले नसताना हे चालान कसे? असा प्रश्न त्यांना पडला,पण गाडीचा क्रमांक सारखाच होता. त्यांनी निरखून पाहिले असता धक्कादायक बाब त्यांच्या लक्षात आली.नियम मोडणाऱ्या वाहनाचा क्रमांक सारखाच असला तरी गाडीची कंपनी आणि वाहनचालक व्यक्तीही वेगळीच होती.ही बाब पोलिसांच्या लक्षात आणून द्यावी म्हणून त्यांनीही पोलिसांकडे तक्रार नोंदविली.चित्रात दर्शविलेली मोपेड आणि त्यावर स्वार व्यक्ती त्यांच्या वाहनाचा क्रमांक वापरून गुन्हे करण्यासाठी वापर करीत असल्याची शक्यता व्यक्त करीत फसले जाण्याची भीती अनिल पवार यांनी व्यक्त केली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना दिलासा; दिवाळीपूर्वी मिळणार पाच हजार रूपयांची मदत..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्र राज्य सरकारने दुष्काळग्रस्त यादीत ४० नवीन तालुक्यांचा समावेश केल्यामुळे ३५८ पैकी एकूण ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे.अश्यातच खरीप...

आता राज्यातील ३०५ तालुके अंतिमतः दुष्काळी तालुके म्हणून घोषित.. – आणखी ४० तालुक्यांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील खरीप हंगामातील दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता राज्य सरकारने दुष्काळग्रस्त तालुक्यांबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे.यापूर्वी ट्रिगर-१(प्रथम कळ)अंतर्गत २६५ तालुके दुष्काळी तालुके म्हणून...

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात मनाई आदेश जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी सण-उत्सव,नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक तसेच संभाव्य आंदोलने व सार्वजनिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा...

आमदार रामदास मसरामांनी आश्रमशाळा व मृतक विद्यार्थीनीच्या कूटूंबियांची घेतली भेट.. -पोलीस निरीक्षकांना आत्महत्या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची सूचना..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्याच्या शासकीय आश्रमशाळा सोनसरी येथील आठव्या वर्गाची विद्यार्थीनी राणू क्रिष्णा हलामी रा.मोहगांव हिने वसतिगृहातच गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सोमवार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!